Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४५-४६

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९४५-४६
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया
तारीख२९ – ३० मार्च १९४६
संघनायकवॉल्टर हॅडलीबिल ब्राउन
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामर्व्ह वॉलेस (२४) बिल ब्राउन (६७)
सर्वाधिक बळीजॅक कोवी (६) बिल ओ'रायली (८)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९४६ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने प्रथमच न्यू झीलंडचा दौरा केला होता. २२ ऑगस्ट १९३९ रोजी इंग्लंड-वेस्ट इंडीजमध्ये कसोटी झाल्यानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे ६ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प पडले होते. जर्मनीचा पाडाव आणि जपानच्या विनाशर्त शरणागतीने दुसरे महायुद्ध संपले आणि क्रिकेटला वाव मिळाला. लागलीच ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड क्रिकेट बोर्डांनी मालिका खेळविण्याचे ठरविले. ऑस्ट्रेलिया संघाने न्यू झीलंडच्या चार प्रथम-श्रेणी संघांशी सराव सामने खेळत दौऱ्याला सुरुवात केली. शेवटचा सामना न्यू झीलंड XI सोबत होता. सामना खेळताना त्याला कसोटी दर्जा दिला नव्हता. परंतु, मार्च १९४८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनानी सामन्याला कसोटी दर्जा म्हणून मान्यता दिली.

या एकमेव कसोटी सामन्यात एकूण १३ खेळाडूंनी पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद बिल ब्राउनकडे होते तर वॉल्टर हॅडली याने न्यू झीलंडचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाने एकमेव कसोटी १ डाव आणि १०३ धावांनी जिंकली.

कसोटी मालिका

एकमेव कसोटी

२९-३० मार्च १९४६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४२ (३९ षटके)
व्हेर्डुन स्कॉट १४
बिल ओ'रायली ५/१४ (१५ षटके)
१९९/८घो (७४ षटके)
बिल ब्राउन ६७
जॅक कोवी ६/४० (२१ षटके)
५४ (३२.२ षटके)
मर्व्ह वॉलेस १४
बिल ओ'रायली ३/१९ (१७ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०३ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन