Jump to content

ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन
अधिकृत संकेतस्थळ
सुरुवात इ.स. १९०५
स्थानमेलबर्न
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
स्थळ मेलबर्न पार्क
कोर्ट पृष्ठभाग गवती (१९०५-८७)
हार्ड (१९८८ - )
बक्षीस रक्कम ऑस्ट्रेलियन डॉलर ७१०००,००० (२०२०)
पुरुष
ड्रॉ 128S / 128Q / 64D
सद्य विजेतेनोव्हाक जोकोविच (एकेरी)
बॉब ब्रायन/माइक ब्रायन (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदेनोव्हाक जोकोविच (७)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे एड्रियन क्विस्ट (१०)
महिला
ड्रॉ 128S / 128Q / 64D
सद्य विजेत्यानाओमी ओसाका (एकेरी)
सारा एरानी/रॉबेर्ता विंची (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदेमार्गारेट कोर्ट (११)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे थेल्मा कॉइन लॉंग (१२)
मिश्र दुहेरी
ड्रॉ ६४
सद्य विजेते बार्बोरा क्रेजीकोव्हा- राजीव राम (२०१९)
ग्रँड स्लॅम
मागील स्पर्धा
२०१९ ऑस्ट्रेलियन ओपन

ऑस्ट्रेलियन ओपन (इंग्लिश: Australian Open) ही चार ग्रॅंड स्लॅम पैकी एक टेनिस स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियन ओपन दरवर्षी जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात मेलबर्न शहरामधील मेलबर्न पार्क ह्या टेनिस संकुलामध्ये भरवली जाते.चाम्पियनशिप सामना 'राॅॅड लॅव्हर एरिना ' स्टेडियम मध्ये खेळवला जातो.

स्पशर्धा १९०५ साली प्रथम खेळवली गेली. १९८७ पर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये गवताळ कोर्ट असत परंतु १९८८ सालापासून हार्ड कोर्टवर येथील सामने खेळवले जाऊ लागले.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.

इतिहास

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा 'टेनिस ऑस्ट्रेलिया' ही ऑस्ट्रेलियातील टेनिस खेळाची कारभार नियंत्रित करणारी सर्वोच्च संस्था आयोजित करते. ह्या चॅम्पियनशिपचे नाव 'ऑस्ट्रेलियन चॅम्पियनशिप' असे होते.१९६९ला ह्या चॅम्पियनशिपचे नाव ऑस्ट्रेलियन ओपन ठेवले गेले.१९०५ पासून ऑस्ट्रेलियन ओपन पाच ऑस्ट्रेलियाच्या नगरांमध्ये आयोजित केले गेले आहे , त्यापैकी दोन नगर हे न्यू झीलंड मधील तर पाच ऑस्ट्रेलियातील आहेत. मेलबर्न (५५ वेळेला), सिडनी मध्ये (१७ वेळेस), ॲडिलेड (१७ वेळेस), पर्थ (३ वेळेस),ब्रिस्बेन ( वेळेस). न्यू झीलंड मध्ये क्राइस्तचर्च(१९०६ ला), हास्टिंग(१९१२ ला‌) आयोजित केले गेले. सर्वात पहिले ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा १९०५ मध्ये आयोजित केली गेली होती.

विजेते

ऑस्ट्रेलियन ओपन खालील मुख्य स्पर्धा असतात. १. पुरुष एकेरी. २. महिला एकेरी. ३. मिश्र दुहेरी. ४ पुरुष दुहेरी. ५. महिला दुहेरी.

वर्तमान विजेते

  • १.पुरुष एकेरी-

नोवाक जोकोविच हा २०१९ ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आहे. त्याचे हे १५ वे टायटल होते. सातवे ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियशिप होते.

पुर्व विजेते

१९६९ साली ऑस्ट्रेलियन ओपेन खुली स्पर्धा झाल्यापासून आंद्रे अगासीरॉजर फेडररने पुरुष एकेरीमध्ये प्रत्येकी चार वेळा तर सेरेना विल्यम्सने महिला एकेरीमध्ये पाच वेळा विजय मिळवला आहे.

२०१२ मधील विजेते

स्पर्धाविजेताउप-विजेतास्कोर
पुरुष एकेरीसर्बिया नोव्हाक जोकोविचस्पेन रफायेल नदाल5–7, 6–4, 6–2, 6–7(5–7), 7–5
महिला एकेरीबेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्कारशिया मारिया शारापोव्हा6–3, 6–0
पुरुष दुहेरीचेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक
भारत लिअँडर पेस
अमेरिका बॉब ब्रायन
अमेरिका माइक ब्रायन
7–6(7–1), 6–2
महिला दुहेरीरशिया स्वेतलाना कुझ्नेत्सोवा
रशिया व्हेरा झ्वोनारेवा
इटली सारा एरानी
इटली रॉबेर्ता व्हिंची
5–7, 6–4, 6–3
मिश्र दुहेरीअमेरिका बेथनी मॅटेक-सॅंड्स
रोमेनिया होरिया तेकाउ
रशिया एलेना व्हेस्निना
भारत लिअँडर पेस
6–3, 5–7, [10–3]

बाह्य दुवे

मागील
यूएस ओपन
ग्रॅंड स्लॅम स्पर्धा
जानेवारी
पुढील
फ्रेंच ओपन