ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२१
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२१ | |||||
बेल्जियम | ऑस्ट्रिया | ||||
तारीख | २४ – २५ जुलै २०२१ | ||||
संघनायक | शेराझ शेख | रझमल शिगीवाल | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बेल्जियम संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | साबेर झकील (१३५) | रझमल शिगीवाल (९८) | |||
सर्वाधिक बळी | शागहेराई सेफत (४) | अकिब इक्बाल (८) |
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान बेल्जियमचा दौरा केला. नियोजनानुसार ऑस्ट्रिया संघ मे २०२१ मध्ये बेल्जियमच्या दौऱ्यावर जाणार होता. बेल्जियममध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता. सरतेशेवटी जुलै २०२१ मध्ये सामने खेळवण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व सामने वॉटर्लू मधील रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान येथे खेळविण्यात आले. हा ऑस्ट्रियाचा पहिला वहिला द्विपक्षीय मालिका दौरा होता तसेच ऑस्ट्रियाचा हा बेल्जियमचा पहिला दौरा होता.
बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकत मायदेशात पहिला वहिला मालिका विजय संपादन केला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
ऑस्ट्रिया १९५/७ (२० षटके) | वि | बेल्जियम १९६/३ (१८ षटके) |
शाहिल मोमीन ६१ (४१) शागहेराई सेफत ३/३३ (४ षटके) | मुहम्मद मुनीब ७०* (५३) साहेल झद्रान २/२८ (३ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, क्षेत्ररक्षण.
- बेल्जियम आणि ऑस्ट्रिया मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रियाने बेल्जियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- मकसूद अहमद, फैजल महमूद, अली रझा, शागहेराई सेफत (बे), इक्बाल होसेन, शाहिल मोमीन आणि वकार झलमाई (ऑ) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ऑस्ट्रियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
बेल्जियम १४६/८ (२० षटके) | वि | ऑस्ट्रिया ३७/३ (६.१ षटके) |
साबेर झकील १००* (४७) अकिब इक्बाल ५/५ (४ षटके) | रझमल शिगीवाल १७* (१४) मुरीद एक्रामी २/१८ (३ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
३रा सामना
बेल्जियम १०३/९ (२० षटके) | वि | ऑस्ट्रिया १०४/४ (१७.२ षटके) |
अली रझा ३१* (२३) अकिब इक्बाल ३/२५ (४ षटके) | अब्रार बिलाल २७* (२०) अझीझ मोहम्मद १/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
- अदनान रझ्झाक (बे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- ऑस्ट्रियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बेल्जियमवर पहिल्यांदाच विजय मिळवला.