Jump to content

ऑल द बेस्ट (चित्रपट)

ऑल द बेस्ट : २००९ मधील हिंदी चित्रपट

कथानक

ऑल द बेस्टची कथा सुरू होते गोव्यात राहणाऱ्या वीरच्या (फरदीन खान) बंगल्यातून. स्वतःचा ब्रास बॅंड असलेला वीर त्याची मैत्रीण विद्या (मुग्धा गोडसे) हिच्यासह स्ट्रगल करतोय. वीरचा मोठा भाऊ धरम (संजय दत्त) याचा लुकास्टो नावाच्या कुठल्याशा आफ्रिकन देशात व्यवसाय आहे. वीरला तो दर महिन्याला घसघशीत पॉकेटमनी पाठवतो आहे. हा पॉकेटमनी दुप्पट होण्यासाठी तो धरमला आपले विद्याशी लग्न झाल्याचे कळवतो. वीरचा रेससाठी लागणाऱ्या मोटारी तयार करणारा मित्र प्रेम (अजय देवगण) कडकीमध्येच आहे. वीरच्याच पॉकेटमनीवर त्याचे मोटारीवरील प्रयोग सुरू आहेत. प्रेमची पत्नी जान्हवी (बिपाशा बासू) प्रेमच्या वडिलांचे जुनाट जिम चालवून पैसा कमावते आहे. प्रवासात असलेल्या धरमचे विमान गोव्याला इमर्जन्सी लॅंडिंग करते व वीर संकटात सापडतो.

विमानतळावर उतरलेला धरम विद्याला पाहण्यासाठी घरी यायला निघतो. वीरला भेटायला आलेली प्रेमची पत्नी जान्हवी हिलाच तो विद्या समजतो. जोड्या बदलतात व "ऑल द बेस्ट' नावाची तुफान एक्‍स्प्रेस भरधाव सुटते...