Jump to content

ऑरोर पॅरिएन्टे

ऑरोर पॅरिएन्टे
जन्म ३ डिसेंबर १९८७
अ‍ॅविग्नॉन, फ्रान्स
राष्ट्रीयत्व फ्रेंच
पेशा अभिनेत्री
पुरस्कार

सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी इग्नाइट-थिएटर कलाकार (२०१३)
लॉरेन्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (२०१९)

ग्लोबल स्टार फीमेल (२०२०)


ऑरोर पॅरिएन्टे (जन्म ३ डिसेंबर १९८७ - अ‍ॅविग्नॉन, फ्रान्स) ही एक फ्रेंच अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी कॅप्रिस, एलॉफ्ट आणि द प्लेयर्स सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.[] २०२० मध्ये तिला ग्लोबल स्टार महिला पुरस्काराने गौरविण्यात आले.[]

मागील जीवन

ऑरोरचा जन्म फ्रान्समध्ये अ‍ॅविग्नॉन शहरात झाला होता. तिची आई डॉक्टर आहे आणि तिचे वडील दंतचिकित्सक होते. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने तिने कारकीर्दच्या सुरुवातीला नाटयगृहात अभिनय केला.[]

अभिनय कारकीर्द

२०१० मध्ये तिने साराह्झ की नावाच्या फ्रेंच फिल्म चित्रपटश्रुष्टीत प्रवेश केला होता. तिच्या डेब्यू चित्रपटात, तिने  लाना नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. २०११ मध्ये द लेडी या चित्रपटात तिने अ‍ॅलिसची भूमिका साकारली होती. २०१२ मध्ये तिने द प्लेयर्स या चित्रपटात मेरीची भूमिका साकारली होती. २०१४ साली ती एलॉफ्ट चित्रपटात सोफीची भूमिका साकारताना दिसली होती. २०१५ मध्ये तिला इमॅन्युएल मॉरेट दिग्दर्शित कॅप्रिस या चित्रपटात भूमिका मिळाली. सध्या ती करत आहे.[][]

चित्रपट

चित्रपट वर्ष भूमिका
साराह्झ की २०१० -
द लेडी २०११ एलिस
द प्लेयर्स २०१२ मेरी
एलॉफ्ट २०१४ सोफी
कॅप्रिस २०१५ मिया

पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी इग्नाइट-थिएटर कलाकार (२०१३)
  • लॉरेन्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (२०१९)
  • ग्लोबल स्टार फीमेल (२०२०)

बाह्य दुवे

ऑरोर पॅरिएंट आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Renowned Model Aurore Pariente Raises the Temperature on Social Media With Her Alluring Photos!". in.news.yahoo.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Esta modelo tatuou 70% do corpo por estar farta de ser comparada a Megan Fox". NiT (पोर्तुगीज भाषेत). 2020-12-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Netizens shower love upon Model Aurore Pariente with fanart and extensive DMs". www.ibtimes.sg (इंग्रजी भाषेत). 2020-11-28. 2021-01-05 रोजी पाहिले.
  4. ^ "Muak Dibandingkan dengan Megan Fox, Model Ini Menato 70 Persen Tubuhnya". suara.com (इंडोनेशियन भाषेत). 2020-09-13. 2021-01-05 रोजी पाहिले.
  5. ^ "Model Claims She Was Offered $1M To Star As Megan Fox In Adult Movie". www.ladbible.com (इंग्रजी भाषेत). 2020-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-26 रोजी पाहिले.