Jump to content

ऑपरेशन सी लायन

ऑपरेशन सी लायन, ऑपरेशन सीलायन किंवा उंटरनेहमेन सीलोव हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने युनायटेड किंग्डमवर आक्रमण करण्याची योजना होती.

फ्रांसच्या पडतीनंतर दोस्त राष्ट्रांनी फ्रांसमधून डंकर्कमार्गे पळ काढल्यावर युनायटेड किंग्डम शरण येईल अशी ॲडॉल्फ हिटलरची धारणा होती. असे न झाल्यास शेवटचा उपाय म्हणून युनायटेड किंग्डमवर चालून जाण्याची हिटलरची योजना होती. जेथून जर्मनीचे सैन्य ब्रिटिश बेटांवर उतरणार होते त्या जागांवर आधीच जर्मनीने आरमारी आणि हवाई वर्चस्व मिळवले पाहिजे ही हिटलरची अट होती, जी प्रत्यक्षात उतरली नाही. लुफ्तवाफे आणि जर्मन आरमाराने चालविलेल्या या प्रयत्नांना समांतर जर्मन सैन्य आणि आरमाराने प्रत्यक्ष चढाईचे बेत करण्यास सुरुवात केली होती. यासाठी असंख्य होड्या, तराफे, मालवाहू तसेच सैनिकवाहू नौका फ्रांसमध्ये इंग्लिश चॅनलच्या किनाऱ्यावर गोळा करण्यात आल्या होत्या.

लुफ्तवाफेला रॉयल एर फोर्सवर वर्चस्व न मिळविता आल्याने हिटलरने १७ सप्टेंबर, १९४० रोजी सी लायनची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्यानंतर ही मोहीम कधीच हाती धरली गेली नाही.