ऑगस्ट ६
ऑगस्ट ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१८ वा किंवा लीप वर्षात २१९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५३८ - गॉंझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
एकोणिसावे शतक
- १८०६ - शेवटच्या पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस दुसऱ्याने पदत्याग केला व पवित्र रोमन साम्राज्याचा शेवट झाला.
- १८२५ - बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८६१ - ब्रिटनने नायजेरियाचे लागोस शहर बळकावले.
- १८९० - न्यू यॉर्कच्या ऑबर्न तुरुंगात विल्यम केमलरला विजेचे झटके देउन मृत्युदंड.
विसावे शतक
- १९०१ - ओक्लाहोमामधील कायोवा जमातीसाठी राखून ठेवण्यात आलेली जमीन श्वेतवर्णीयांना बळकावण्याची मुभा देण्यात आली व त्याद्वारे या जमातीला स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले.
- १९१४ - पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९१७ - पहिले महायुद्ध - माराशेष्टीची लढाई.
- १९२६ - हॅरी हुडिनीने पाण्याखाली एका सीलबंद पेटीत ९१ मिनिटे राहून नंतर सुटका करून घेतली.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो पुढील काही वर्षांत भाजल्याने व किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
- १९६० - क्युबाची क्रांती - अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला उत्तर म्हणून क्युबाने अमेरिकेसह सगळ्या परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.
- १९९० - पहिले अखाती युद्ध - कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
- १९९७ - कोरियन एरलाइन्स फ्लाइट ८०१ हे बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमानतळावर उतरताना कोसळले. २२८ ठार.
एकविसावे शतक
जन्म
- ११८० - गो-तोबा, जपानी सम्राट.
- १६९७ - चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
- १८०९ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.
- १८८१ - अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
- १९१६ - दॉम मिंटॉफ, माल्टाचा पंतप्रधान.
- १९२८ - अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.
- १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.
मृत्यू
- २५८ - पोप सिक्स्टस दुसरा.
- ५२३ - पोप हॉर्मिस्दस.
- १२७२ - स्टीवन पाचवा, हंगेरीचा राजा.
- १४५८ - पोप कॅलिक्स्टस तिसरा.
- १९७३ - फुलजेन्सिओ बॅटिस्टा, क्युबाचा हुकुमशहा.
- १९७८ - पोप पॉल सहावा.
- १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
- २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - बॉलिव्हिया, जमैका.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट महिना