ऑगस्ट ५
ऑगस्ट ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१७ वा किंवा लीप वर्षात २१८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
बारावे शतक
- ११०० - हेन्री पहिला इंग्लंडच्या राजेपदी.
चौदावे शतक
एकोणिसावे शतक
- १८६० - कार्ल चौथा स्वीडनच्या राजेपदी.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
- १८८२ - जपानमध्ये लश्करी कायदा लागू.
विसावे शतक
- १९०१ - पीटर ओ'कॉनोरने २४ फूट ११.७५ ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
- १९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरात सुरू झाला.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
- १९४४ - ज्यूंचे शिरकाण - पोलिश क्रांतीकाऱ्यांनी वॉर्सोतील कारागृहातून ३४८ बंद्यांची सुटका केली.
- १९४९ - इक्वेडोरमध्ये भूकंप. ६,००० ठार.
- १९६० - बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६२ - मॅरिलिन मन्रोने आत्महत्या केली.
- १९६२ - दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाला कैद. २८ वर्षांनी १९९०मध्ये सुटका.
- १९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. टिकोंडेरोगा व यु.एस.एस. कॉन्स्टेलेशन या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांनी टोंकिनच्या अखातातील हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून उत्तर व्हियेतनामवर बॉम्बफेक केली. वस्तुतः टोंकिनच्या अखातातील हल्ला ही बनावट घटना होती.
- १९८१ - अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले.
- १९९५ - क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.
एकविसावे शतक
- २००६ - मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
- २०१२ - अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ओक क्रीक शहरातील गुरुद्वारामध्ये घुसून एका माथेफिरूने गोळीबार केला. सहा व्यक्ती ठार. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले.
- २०१९ - जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन. जम्मू आणि काश्मीर व लद्दाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात.
जन्म
- १८०२ - नील्स हेन्रिक एबेल, नॉर्वेजियन गणितज्ञ.
- १८१५ - देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १८१५ - एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक.
- १८६६ - हॅरी ट्रॉट, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- १९०८ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा १७वा पंतप्रधान.
- १९६२ - रिचर्ड डि ग्रोएन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - अतुल समरसेकरा, श्रीलंकी क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - व्हॅस्बर्ट ड्रेक्स, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - आकिब जावेद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - सनवर होसेन, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ८८२ - लुई तिसरा, फ्रांसचा राजा.
- १३६४ - कोगोन, जपानी सम्राट.
- १९४४ - मॉरिस टर्नबुल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - बर्किना फासो.
- विजयदिन, मातृभूमी आभार दिन - क्रोएशिया.
- बाल दिन - चिली.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ३ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट महिना