ऑगस्ट ३०
ऑगस्ट ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४२ वा किंवा लीप वर्षात २४३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.
अठरावे शतक
- १७९९ - सर राल्फ ऍबरक्रॉम्बीच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीने डच आरमार पकडले.
एकोणिसावे शतक
- १८३५ - ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना.
- १८३५ - अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-बुल रनची दुसरी लढाई.
विसावे शतक
- १९१८ - फान्या कॅप्लानने व्लादिमिर लेनिन वर खूनी हल्ला केला.
- १९४१ - दुसरे महायुद्ध-लेनिनग्राडचा वेढा सुरू झाला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध-हॉंगकॉंगची जपानच्या आधिपत्यातून सुटका.
- १९७४ - झाग्रेब मध्ये रेल्वे रुळांवरून घसरून १५३ ठार.
- १९८४ - स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.
- १९९० - तातारस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.
एकविसावे शतक
जन्म
- १३३४ - पीटर पहिला, कॅस्टिलचा राजा.
- १३७७ - शाहरुख, पर्शियाचा राजा.
- १८५६ - कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
- १९३० - वॉरेन बफे, अमेरिकन उद्योगपती.
- १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - परवेझ सज्जाद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११५८ - सांचो तिसरा, कॅस्टिलचा राजा.
- १४२८ - शोको, जपानी सम्राट.
- १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
- १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई.
- १७७३ - नारायणराव पेशवे, मराठा साम्राज्याचे १२वे पेशवे
- १९४९ - आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
- विजय दिन - तुर्कस्तान.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - सप्टेंबर १ - ऑगस्ट महिना