ऑगस्ट १७
ऑगस्ट १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२९ वा किंवा लीप वर्षात २३० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
चौथे शतक
३०९/ ३१० - पोप युसेबियसला सम्राट मॅक्सेंटियस याने सिसिलीला पाठवले, जिथे त्याचा मृत्यु झाला.
सातवे शतक
६८२ - पोप लिओ II ने पोप बनला.
एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरून हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.
विसावे शतक
- १९१४ - पहिले महायुद्ध-स्टालुपॉनेनची लढाई - जर्मनीचा रशियन सैन्यावर विजय.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने अमेरिकेची ६० लढाउ विमाने.
- १९४५ - ईंडोनेशियाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य.
- १९६० - गॅबनला फ्रांस पासून स्वातंत्र्य.
- १९६३ - जपानमध्ये फेरीबोट बुडाली. ११२ ठार.
- १९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनाऱ्यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.
- १९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.
- १९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
- १९९९ - तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.
एकविसावे शतक
- २००५ - बांगलादेशच्या ६४पैकी ६३ जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट. दोन ठार.
- २००८ - मायकेल फेल्प्सने २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला.
जन्म
- १६२९ - जॉन तिसरा, पोलंडचा राजा.
- १८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
- १८७८ - रेजी डफ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - चार्ल्स पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
- १९१३ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबऱ्या.
- १९२६ - ज्यॉंग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.
- १९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.
- १९७२ - हबीबुल बशर, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
मृत्यू
- १३०४ - फुकाकुसा, जपानी सम्राट.
- १७८६ - फ्रेडरिक दुसरा, प्रशियाचा राजा.
- १९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - ईंडोनेशिया.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १५ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट १९ - ऑगस्ट महिना