ऑक्टोबर ३१
ऑक्टोबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०४ वा किंवा लीप वर्षात ३०५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८६३ - ग्रेट ब्रिटनने न्यू झीलंडच्या वैकाटोवर हल्ला केला
- १८६४ - नेव्हाडा अमेरिकेचे ३६वे राज्य झाले
- १८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
- १८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग
विसावे शतक
- १९१३ - लिंकन हायवे या अमेरिकेच्या दोन्ही तीरांना जोडणारा मोटरकार जाऊ शकणारा अशा पहिला रस्त्याचे उद्घाटन
- १९१७ - पहिले महायुद्ध - बीरशेबाची लढाई
- १९२० - भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन काँग्रेस)ची स्थापना
- १९४१ - माउंट रशमोर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण
- १९४१ - दुसरे महायुद्ध - यु.एस.एस. रुबेन जेम्स या अमेरिकन विनाशिकेला जर्मन पाणबुडीने बुडविले. १०० खलाशी ठार
- १९४१ - हडर्सफील्ड, इंग्लंड येथील कपड्यांच्या कारखान्यात आग लागून ४९ ठार
- १९६३ - इंडियानापोलिसमधील आइस रिंकमध्ये स्फोट होउन ७४ ठार, ४०० जखमी
- १९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीची आपल्याच अंगरक्षकांकडून हत्या
- १९९४ - अमेरिकन ईगल एरलाइन्सचे ए.टी.आर. ७२ प्रकारचे विमान रोझलॉन, इंडियाना येथे कोसळले. ६८ ठार
- १९९६ - टॅम त्रांसपोर्तेस एरोस रिजनैस फ्लाइट ४०२ हे फोक्कर एफ. १०० प्रकारचे विमान साओ पाउलो येथे घरांवर कोसळले. जमीनीवरील दोघांसह ९८ ठार
- १९९९ - इजिप्तएर फ्लाइट ९९० हे विमान नान्टकेट, मॅसेच्युसेट्स जवळ समुद्रात कोसळले. २१७ ठार
- १९९९ - कोणाचीही मदत न घेता एकट्याने शीडबोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करून ११ महिन्यांनी जेसी मार्टिन मेलबोर्नला परतला
एकविसावे शतक
- २००० - सिंगापूर एरलाइन्स फ्लाइट ००६ हे बोईंग ७४७-४०० प्रकारचे विमान ताइपेइ विमानतळावरून उड्डाण करताना धावपट्टीवरील बांधकाम साहित्याला धडकले. ८३ ठार.
- २००० - उत्तर ॲंगोलातून उड्डाण केल्याकेल्या स्फोट होउन ॲंतोनोव्ह ए.एन. २६ प्रकारचे विमान कोसळले. ५० ठार
- २००० - सोयुझ टी.एम.-३१ प्रकारच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहण्यासाठीचा पहिला गट रवाना. या दिवसापासून स्थानकात कायम मानववस्ती आहे
- २०१५ - कोगालिमाव्हिया फ्लाइट ९२६८ हे एरबस ए३२१ प्रकारचे विमान उत्तर साइनाई द्वीपकल्पावर कोसळले. २२४ ठार.
जन्म
- १३४५ - फर्नांडो पहिला, पोर्तुगालचा राजा
- १३९१ - दुआर्ते, पोर्तुगालचा राजा
- १४२४ - व्लादिस्लॉस, पोलंडचा राजा
- १७०५ - पोप क्लेमेंट चौदावा
- १८३५ - एडॉल्फ फोन बेयर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ
- १८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान
- १८८७ - च्यांग कै-शेक, चिनी नेता
- १८८७ - विल्यम व्हायसॉल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १८९५ - सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९२२ - नोरोदोम सिहोनुक, कम्बोडियाचा राजा
- १९२६ - एच.आर.एफ़. कीटिंग, मुंबई शहर ही पार्श्वभूमी असलेल्या रहस्यकथा लिहिणारा इंग्रजी लेखक
- १९३१ - डॅन रादर, अमेरिकन पत्रकार
- १९४६ - रामनाथ परकार, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९६१ - पीटर जॅक्सन, न्यू झीलंडचा चित्रपट दिग्दर्शक
मृत्यू
- १४४८ - जॉन आठवा पॅलियोलोगस, बायझेन्टाईन सम्राट
- १७३२ - व्हिक्टर आमाद्युस दुसरा, सव्हॉयचा राजा
- १९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार
- १९८४ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान
- १९९९ - डॉ.भय्यासाहेब ओंकार वास्तव शैलीत चित्रे काढणारे मराठी चित्रकार
- २००५ - अमृता प्रीतम, ज्ञानपीठविजेती लेखिका
प्रतिवार्षिक पालन
- हॅलोवीन - ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथ.
- मृतकांचा दिवस - फिलिपाईन्स.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर ३१ - नोव्हेंबर १ - नोव्हेंबर २ - ऑक्टोबर महिना