ऑक्टोबर ३
ऑक्टोबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७६ वा किंवा लीप वर्षात २७७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
- २३३३ - चीनी सम्राट याओच्या राज्यकालादरम्यान सध्याच्या कोरियामध्ये गोजोस्योन राष्ट्राची स्थापना.
अठरावे शतक
- १७३९ - रशिया व ऑट्टोमन साम्राज्यात निसाचा तह.
एकोणिसावे शतक
- १८६३ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थॅंक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला.
विसावे शतक
- १९०८ - व्हियेनामध्ये लेओन ट्रोट्स्की, एडॉल्फ जॉफ, माटव्हे स्कोबेलेव्ह व इतर रशियन नागरिकांनी प्रावदा हे बातमीपत्र सुरू केले.
- १९१८ - बोरिस तिसरा बल्गेरियाच्या राजेपदी.
- १९२९ - सर्बिया क्रोएशिया व स्लोव्हेनियाने एकत्र येउन युगोस्लाव्हिया राष्ट्राची निर्मिती केली.
- १९३२ - इराकला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- १९३५ - इटलीने इथियोपियावर हल्ला केला.
- १९४२ - जर्मनीतील पीनेमुंडे येथील तळावरून सर्वप्रथम व्ही-२ ए-४ क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण. हे क्षेपणास्त्र म्हणजे अंतराळात पोचलेली सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
- १९८१ - बेलफास्टमधील मझे कारागृहातील बंदीवास्यांचे उपोषण सात महिन्यांनी संपले.
- १९८५ - स्पेस शटल अटलांटिसने अंतराळात प्रथमतः झेप घेतली.
- १९९० - पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.
- १९९५ - ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खुनाच्या आरोपातून सुटका.
एकविसावे शतक
- २००३ - लास व्हेगास येथे नाट्यमंचावर वाघ व सिंहांकडून खेळ करवून घेणाऱ्या सिगफ्रीड आणि रॉय या जोडींपैकी रॉय हॉर्नवर एका वाघाने प्रेक्षकांसमोरच घातकी हल्ला चढवला. हॉर्न जेमतेम वाचला पण त्यांचा खेळ बंद करण्यात आला.
- २०१३ - लिब्यातून निघालेल्या निर्वासितांची नाव इटलीजवळ बुडून १३४ मृत्युमुखी.
जन्म
- १८६२ - जॉनी ब्रिग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९१ - विल्यम लिंग, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - एरॉल हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - रे लिंडवॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - गॅरी ट्रूप, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - नीव्ह कॅम्पबेल, केनेडीयन अभिनेत्री.
- १९८० - सॅराह कॉल्येर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - ऍशली सिम्पसन, अमेरिकन गायिका.
मृत्यू
- १२२९ - संत फ्रांसिस.
- १५६८ - व्हाल्व्हाची एलिझाबेथ.
- १५९६ - फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक.
- १९२९ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
प्रतिवार्षिक पालन
- जर्मन एकता दिन - जर्मनी.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १ - ऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर महिना