ऑक्टोबर २९
ऑक्टोबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०१ वा किंवा लीप वर्षात ३०२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६१८ - इंग्लंडच्या राजा जेम्स पहिल्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली सर वॉल्टर रॅलेला मृत्युदंड
- १६६५ - अंबुलियाची लढाई - पोर्तुगालच्या सैन्याने कॉंगोच्या सैन्याला हरवून राजा ॲंटोनियो पहिल्याचा शिरच्छेद केला
एकोणिसावे शतक
- १८५१ - बंगाल मधे ब्रिटिश इंडियन एसोसिएशनची थापना
- १८५९ - स्पेनने मोरोक्कोविरुद्ध युद्ध पुकारले
विसावे शतक
- १९१८ - जर्मनीच्या आरमारी खलाशांनी उठाव केला
- १९२० - पूर्व राष्ट्रपति जाकिर हुसैन यांच्या प्रयत्नाने जामिया मिलिया इस्लामियाची स्थापना
- १९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
- १९२९ - ब्लॅक ट्युसडे - न्यू यॉर्क शेर बाजारातील रोख्यांचे भाव कोसळले. जागतिक महामंदीची ही नांदी मानली जाते
- १९४१ - ज्यूंचे शिरकाण - कौनास शहरात जर्मन सैन्याने १०,००० ज्यूंना गोळ्या घालून ठार मारले
- १९४५ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष गेतुलियो व्हार्गासने राजीनामा दिला
- १९४५ - जगात पहिले पहिले बॉल पोइंट पेन बाजारात आले
- १९५३ - सान फ्रांसिस्कोजवळ बी.सी.पी.ए. फ्लाइट ३०४ हे डग्लस डी.सी.-६ प्रकारचे विमान कोसळून १९ ठार
- १९५६ - स्वतंत्र शहर असलेले टॅंजियर्स मोरोक्कोमध्ये पुन्हा विलीन
- १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार
- १९६४ - टांगानिका आणि झांझीबार एकत्र होऊन टांझानियाची रचना
- १९९८ - तुर्कस्तानच्या अदना शहरापासून अंकाराला जाणाऱ्या विमानाचे अपहरण. वैमानिकाने आपण सोफियाला उतरत असल्याचा बनाव करून विमान अंकारात उतरवले
- १९९८ - हरिकेन मिच होन्डुरासच्या किनाऱ्यावर धडकले
- १९९८ - गोथेनबर्गमधील नाइटक्लबमधील आगीत ६३ ठार, २०० जखमी
- १९९९ - ओडिशाच्या किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळाने अतोनात नुकसान केले
एकविसावे शतक
- २००२ - व्हियेतनामच्या हो चि मिन्ह सिटी शहरातील दुकानात लागलेल्या आगीत ६० ठार, १०० बेपत्ता
- २००५ - दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६०पेक्षा जास्त व्यक्ती ठार
- २००८ - डेल्टा एरलाइन्स आणि नॉर्थवेस्ट एरलाइन्स एकत्रित होऊन जगातील सगळ्यात मोठ्या विमानवाहतूक कंपनी तयार
जन्म
- १०१७ - हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट
- १८७० - चार्ल्स इडी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १८७७ - विल्फ्रेड ऱ्होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १८७९ - फ्रांझ फोन पापेन, जर्मनीचा चान्सेलर
- १८९७ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी
- १९११ - रामचंद्र नारायण चव्हाण, वाईचे बहुजन समाज हितकर्ते विचारवंत व लेखक.
- १९१५ - डेनिस ब्रूक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९३५ - डेव्हिड ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९३८ - एलेन जॉन्सन-सर्लिफ, लायबेरियाची राष्ट्राध्यक्ष
- १९४१ - ब्रायन यूली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९४६ - अनुरा टेनेकून, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
- १९६९ - डगी ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९७१ - मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १९७१ - ग्रेग ब्लुएट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १९७१ - वायनोना रायडर, अमेरिकन अभिनेत्री
- १९७३ - ऍडम बाचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
- १९७४ - मायकेल वॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९८५ - विजेन्द्र कुमार सिंह, भारतीय बॉक्सर
मृत्यू
- १६१८ - सर वॉल्टर रॅले, इंग्लिश शोधक
- १९११ - जोसेफ पुलित्झर, वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक
- १९५० - गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा
- १९६७ - डॉ. कूर्तकोटी, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्मप्रचारक
- १९९४ - सरदार स्वर्णसिंग, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री
प्रतिवार्षिक पालन
- प्रजासत्ताक दिन - तुर्कस्तान
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर ३१ - ऑक्टोबर महिना