ऑक्टोबर २४
ऑक्टोबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९७ वा किंवा लीप वर्षात २९८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
तेरावे शतक
- १२६० - शार्त्र्सच्या कॅथेड्रलचे उद्घाटन.
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९१७ - ऑक्टोबर क्रांतीची सुरुवात.
- १९३० - ब्राझिलमध्ये राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन लुइस परेरा दि सूसाची उचलबांगडी.
- १९३५ - इटलीने इथियोपिया वर हल्ला केला.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई - जपानची विमानवाहू नौका झुइकाकु आणि युद्धनौका मुसाशीला जलसमाधी.
- १९४५ - संयुक्त राष्ट्रांची स्थापना.
- १९६० - नेडेलिन दुर्घटना - बैकानुर कॉस्मोड्रोमवर आर-१६ प्रकारचे क्षेपणास्त्र जमिनीवरच फुटले. फील्ड मार्शल मित्रोफॅन नेडेलिन सह १०० ठार.
- १९६२ - भारत-तिबेट सीमा पोलीस दल स्थापना
- १९६४ - उत्तर ऱ्होडेशियाला युनायटेड किंग्डमपासून झांबिया या नावाने स्वातंत्र्य.
- १९९८ - डीप स्पेस १ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
एकविसावे शतक
- २००३ - कॉंकोर्डची शेवटची प्रवासी सफर.
जन्म
- ५१ - डोमिशियन, रोमन सम्राट.
- १७६३ - डोरोथिया फोन श्लेगेल, जर्मन लेखिका.
- १७८८ - सारा हेल, अमेरिकन कवियत्री.
- १८०४ - विल्हेल्म एडुआर्ड वेबर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५४ - हेंड्रिक विलेम बाख्विस रूझेबूम, डच रसायनशास्त्रज्ञ.
- १८५५ - जेम्स एस. शेर्मान, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १८५७ - नेड विल्यमसन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १८९१ - रफायेल मोलिना-त्रुहियो, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०६ - अलेक्झांडर गेलफॉंड, रशियन गणितज्ञ.
- १९२० - मार्सेल-पॉल श्युत्झेनबर्गर, फ्रेंच गणितज्ञ.
- १९२३ - डेनिस लेव्हेर्तोव्ह, इंग्लिश कवी.
- १९३० - सुलतान अहमद शाह, मलेशियाचा राजा.
- १९३२ - पिएर-गिलेस दि जेनेस, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९३२ - रॉबर्ट मुंडेल, केनेडियन अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९८१ - मल्लिका शेरावत, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९८५ - वेन रूनी, इंग्लिश फुटबॉल खेळाडू.
मृत्यू
- ९९६ - ह्यु कापे, फ्रांसचा राजा.
- १२६० - सैफ अद-दिन कुतुझ, इजिप्तचा सुलतान.
- १३७५ - वाल्देमार चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९४४ - लुई रेनॉल्ट, फ्रांसचा कार उद्योजक.
- १९६८ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,मोझरी[१]
- १९७२ - जॅकी रॉबिन्सन, पहिला श्यामवर्णीय अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- २००५ - होजे अझ्कोना देल होयो, हॉन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१३ - मन्ना डे
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - झाम्बिया.
- संयुक्त राष्ट्र दिन.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ
- ^ "अधिकृत संकेतस्थळावरील मजकूर". 2017-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-10-25 रोजी पाहिले.
ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर महिना