ऑक्टोबर १५
ऑक्टोबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८८ वा किंवा लीप वर्षात २८९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरीय दिनदर्शिका लागू केली इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये या वर्षी ऑक्टोबर ४ नंतर एकदम ऑक्टोबर १५ हा तारीख आली.
एकोणिसावे शतक
- १८६३ - एच.एल. हनली ही पाणबुडी आपल्या शोधक होरेस एल. हनलीसह बुडाली.
- १८८० - मेक्सिकोच्या सैन्याने अपाची सरदार व्हिक्टोरियोला मारले.
विसावे शतक
- १९१७ - पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माटा हारीला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
- १९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण.
- १९३९ - न्यू यॉर्क म्युनिसिपल विमानतळाचे (नंतरचे लग्वार्डिया विमानतळ) उद्घाटन.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
- १९४६ - दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्ग खटला - आपल्या मृत्युदंडाच्या आदल्या रात्री हेर्मान गोअरिंगने विष घेउन आत्महत्या केली.
- १९५६ - फोर्ट्रानचा उपयोग सुरू.
- १९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दीक्षाभूमी येथे आपल्या उर्वरित सुमारे २ लक्ष अनुयायांसोबत दुसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.
- १९७० - मेलबोर्नमध्ये वेस्ट गेट पूलाचा भाग कोसळून ३५ कामगार ठार.
- १९७० - एरोफ्लोत फ्लाइट २४४ या विमानाचे तुर्कस्तानला अपहरण.
- १९९७ - शनिकडे जाणाऱ्या कॅसिनी अंतराळयानाचे केप केनॅव्हरल येथून प्रक्षेपण.
- १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरून पुढे गेले.
एकविसावे शतक
- २००३ - चीनच्या शेन्झौ ५ या पहिल्या समानव अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- २००३ - स्टेटन आयलंड फेरी अँड्रु जे. बार्बेरी स्टेटन आयलंड येथील धक्क्याला धडकली. ११ ठार, ४३ जखमी.
जन्म
- १५४२ - अकबर,मोगल बादशहा.
- १६०८ - टॉरिसेली, हवाभारमापकाचाचा इटालियन संशोधक.
- १९२३ - गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक.
- १९२६ - नारायण सुर्वे, पद्मश्री पुरस्कारविजेते मराठी कवी
- १९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती.
- १९५७: मीरा नायर, भारतीय-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्माती
मृत्यू
- ८९८ - लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट.
- १३८९ - पोप अर्बन सहावा.
- १९१८ - साई बाबा (शिर्डी).
- १९३० - हर्बर्ट हेन्री डाउ, अमेरिकन उद्योगपती.
- १९४५ - पिएर लव्हाल, विची फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४६ - हेर्मान गोरिंग, नाझी अधिकारी.
- १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक.
- १९८७ - थॉमस संकरा, बर्किना फासोचा क्रांतीकारी.
- २००० - कॉन्राड एमिल ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ.
- २००२ - ना. सं. इनामदार ऐतिहासिक मराठी कादंबरीकार.
- २००२ - वसंत सबनीस मराठी साहित्यिक, कथाकार व पटकथालेखक
प्रतिवार्षिक पालन
- शिक्षक दिन - ब्राझिल.
- जागतिक विद्यार्थी दिन - केवळ भारतात.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर महिना