ऑक्टोबर १
ऑक्टोबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७४ वा किंवा लीप वर्षात २७५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
इ.स.पू. चौथे शतक
- ३३१ - ग्वागामेलाची लढाई - अलेक्झांडर द ग्रेटने दरायस तिसऱ्याला हरवले.
अठरावे शतक
- १७९५ - फ्रांसने बेल्जियमचा पाडाव केला.
एकोणिसावे शतक
- १८०० - इल्देफॉन्सोचा तह - स्पेनने लुईझियाना फ्रांसकडे सुपूर्त केले.
- १८२७ - आयव्हन पास्केविचच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्य आर्मेनियाची राजधानी येरेवानमध्ये घुसले व एक हजारपेक्षा जास्त वर्षे असलेली मुस्लिम सत्ता हुसकावून लावली.
- १८६९ - ऑस्ट्रियामध्ये पहिल्यांदा पोस्टकार्डचा वापर.
- १८८७ - ब्रिटिश सैन्याने बलूचिस्तानमध्ये शिरकाव केला.
- १८९१ - स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना.
- १८९८ - झार निकोलाय दुसऱ्याने ज्यू व्यक्तींची रशियातून हकालपट्टी केली.
विसावे शतक
- १९१० - लॉस एंजेल्समधील एल.ए. टाइम्स दैनिकाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट. २१ ठार.
- १९१८ - पहिले महायुद्ध - लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या नेतृत्वाखाली अरब सैन्याने दमास्कस जिंकले.
- १९२८ - सोवियेत संघाची पहिली पंचवार्षिक योजना लागू. भारतातील पंचवार्षिक योजना यावर आधारित होत्या.
- १९३६ - स्पेनमध्ये फ्रांसिस्को फ्रॅंको सत्तेवर.
- १९३८ - जर्मनीने सुडेटेनलॅंड बळकावले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - हॉंगकॉंगहून ब्रिटिश युद्धकैदी घेउन जाणाऱ्या लिस्बन मारु जहाजावर यु.एस.एस. ग्रुपरने हल्ला केला.
- १९४६ - न्युरेम्बर्ग खटला - नाझी अधिऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
- १९४६ - मेन्सा इंटरनॅशनलची स्थापना.
- १९४७ - एफ.८६ सेबरजेट विमानाचे पहिले उड्डाण.
- १९५७ - अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट असे छापणे सुरू केले.
- १९५८ - नासाची स्थापना.
- १९६० - नायजेरियाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.
- १९६१ - पूर्व कामेरून व पश्चिम कामेरूनने एकत्र येउन कामेरून देशाची रचना केली.
- १९६४ - शिंकांसेनची सुरुवात.
- १९६६ - वेस्ट कोस्ट एरलाइन्स फ्लाइट ९५६ हे डी.सी. ९ प्रकारचे विमान ओरेगॉनच्या वेम्मे शहराजवळ कोसळले. १८ ठार.
- १९७१ - फ्लोरिडात ओरलॅंडो येथे वॉल्ट डिझ्नी वर्ल्डचे उद्घाटन.
- १९७८ - टुव्हालुला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.
- १९७९ - अमेरिकेने पनामा कालवा पनामाच्या हवाली केला.
- १९८२ - सोनी कॉर्पोरेशनने सीडी प्लेयर[मराठी शब्द सुचवा] विकायला सुरुवात केली.
- १९९४ - पलाऊला स्वातंत्र्य.
एकविसावे शतक
- २००५ - इंडोनेशियातील बाली बेटावर बॉम्ब हल्ला. १९ ठार.
जन्म
- १२०७ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १६७१ - ग्विदो ग्रांदी, इटालियन गणितज्ञ.
- १६८५ - चार्ल्स सहावा, पवित्र रोमन सम्राट.
- १७६० - विल्यम थॉमस बेकफोर्ड, इंग्लिश लेखक व राजकारणी.
- १७९१ - सर्गेई अक्साकोव्ह, रशियन लेखक.
- १८४२ - चार्ल्स क्रॉस, फ्रेंच कवी व शोधक.
- १८८१ - विल्यम बोईंग, अमेरिकन विमानअभियंता.
- १८८५ - लुईस उंटेरमायर, अमेरिकन लेखक.
- १८९६ - लियाकत अली खान, पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान.
- १८९९ - अर्नेस्ट हेकॉक्स, अमेरिकन लेखक.
- १९०० - टॉम गॉडार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०४ - ए.के. गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेता.
- १९१० - बॉनी पार्कर, अमेरिकन दरोडेखोर.
- १९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.
- १९२० - वॉल्टर मथाऊ, अमेरिकन अभिनेता.
- १९२४ - जिमी कार्टर, अमेरिकेचा ३९वा राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेता.
- १९२४ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश.
- १९५० - रॅंडी क्वेड, अमेरिकन अभिनेता.
- १९६३ - मार्क मॅकग्वायर, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
मृत्यू
- ९५९ - एड्वी, इंग्लंडचा राजा.
- १४०४ - पोप बॉनिफेस नववा.
- १९४२ - ॲंट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - ऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर महिना