Jump to content

ऐरण

ऐरण

ऐरण (इंग्लिश: anvil, अ‍ॅन्विल ;) हे एक प्राथमिक अवजार आहे. हिच्या प्राथमिक स्वरूपात अन्य एखादी वस्तू हिच्यावर ठेवून ठोकण्याजोग्या, कठीण पृष्ठभागाच्या ठोकळ वस्तूसारखे हिचे स्वरूप असू शकते. ऐरणीतील जडत्वामुळे प्रहार करणाऱ्या अवजारातील गतिज ऊर्जेचे रूपांतर लक्ष्य वस्तूचे रूपपालटात होते. ऐरणीवरील कामांच्या स्वरूपानुसार तिला विशिष्ट आकार दिलेला असतो. लोहारकाम वा सोन्याचे काम करतांना तप्त धातू ऐरणीवर ठेवून तो हातोड्याने ठोकतात व त्या धातूला आवश्यक आकारात आणल्या जाते. लोहारकामाची ऐरण मोठी तर सोन्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी ऐरण आकारमानाने छोटी असते.

एक लोहार, ऐरण (खालील) व हातोडा (वरील) वापरून लोखंडाच्या सळईस आकार देताना
एकशिंगी ऐरण (१) शिंग-कड्या करण्यासाठी, (२) पायरी-काटकोनात आकार देण्यास (३)गरम धातू ठोकण्यासाठीची जागा (४) कांबीसारखा गोल आकार देण्यासाठी (५) चौकोनी आकार देण्यासाठी

बाह्य दुवे