ए.टी.आर.
एरेइ दा त्रास्पोर्तो रिजियोनाल तथा एव्हियोन्स दि त्रान्सपोर्त रिजनल (ए.टी.आर.) ही इटली व फ्रांस स्थित विमान कंपनी आहे. ही कंपनी १९८१मध्ये एरोस्पाशियाल (आता ई.ए.डी.एस.) व एरिटालिया (आता अलेनिया एरोनॉटिका) या कंपन्यांनी स्थापन केली होती.[१] ए.टी.आर. ७२ व ए.टी.आर. ४२ ही या कंपनीची प्रमुख विमाने आहेत.
नेपल्सजवळच्या पोमिग्लियानो दार्को येथे अलेनिया एरोनॉटिकाच्या कारखान्यात या विमानांचे धड व शेपट्या तयार केले जातात. पंख फ्रांसच्या बोर्दूमधील ई.ए.डी.एस.च्या कारखान्यात तयार होतात. यांची जोडणी, उड्डाण-चाचणी व प्रमाणीकरण तूलूमधील ए.टी.आर.ची कार्यालये करतात.[२]
संदर्भ व नोंदी
- ^ "एटीआर माइलस्टोन्स". 2007-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-10-04 रोजी पाहिले.
- ^ ए.टी.आर.चे संकेतस्थळ