ए.एक्स. त्रिंदाद
ए.एक्स. त्रिंदाद | |
पूर्ण नाव | आंतोनियो झेवियर त्रिंदाद (Antonio Xavier Trindade) |
जन्म | १८७० गोवा, भारत |
मृत्यू | १९३५ |
कार्यक्षेत्र | चित्रकला, कलाअध्यापन |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई |
शैली | वास्तववादी |
ए.एक्स. त्रिंदाद (१८७० - १९३५) हे व्यक्तिचित्रणाकरता नावाजेलेले गोवेकर चित्रकार होते.
जीवन
त्रिंदादांचा जन्म १८७० साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात पोर्तुगीज कॅथॉलिक कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईच्या 'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर आपल्या व्यावसायिक कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांनी मुंबईतल्या 'राजा दीनदयाळ फोटो स्टुडिओ'मध्ये काम केले. १९२१ साली त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अध्यापनाची जबाबदारीही स्वीकारली.
व्यक्तिचित्रांकरता त्रिंदादांची विशेष ख्याती होती.
१९३५ साली त्रिंदादांचा मृत्यू झाला.