एस. जगतरक्षणन
एस.जगतरक्षणन (ऑगस्ट १५, इ.स. १९५०- हयात) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील अरक्कोणम (लोकसभा मतदारसंघ) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.