एर मॉरिशस
| ||||
स्थापना | १४ जून १९६७ | |||
---|---|---|---|---|
हब | सर शिवसागर रामगुलाम आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
विमान संख्या | १२ | |||
गंतव्यस्थाने | २० | |||
मुख्यालय | पोर्ट लुईस | |||
संकेतस्थळ | [१] |
एर मॉरिशस ही मॉरिशस या राष्ट्राची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे.[१] मॉरिशसचे पोर्ट लुइस शहरात या कंपनीचे मुख्य कार्यालय एर मॉरिशस सेंटर आहे. त्याचे मुख्य केंद्र सर सीवूसगुर रंगूळम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.[२]
ही कंपनी म्हणजे सब-साहरण आफ्रिकेची चौथी सर्वात मोठा विस्तार झालेली विमान सेवा आहे.[३] तसेच युरोप ,आफ्रिका,आणि भारतीय ऊपखंडातिल व्यवसायात मोठे स्थान प्राप्त केलेले आहे. या कंपनीने सातवे स्थान प्राप्त केरून “ सन 2011 Indian Ocean Leading Air Line Prize” मिळविलेले आहे. [४]
इतिहास
14-6-1967 रोजी एर फ्रांस, BOAC या उधयोग समूहाने ही कंपनी स्थापन केली. या उध्योगाने 27.5% भाग खरेदी केले तेवढेच भाग मॉरिशस सरकारने खरेदी केले. बांकी भाग मॉरिशस येथील एर फ्रांस आणि BOACचे व्यापारी दलाल रॉजर्स आणि कं. ली. ने खरेदी केले. [५]
सुरुवातीला या कंपनीची आंतरराष्ट्रीय विमान सेवा एर फ्रांस,एअर इंडिया,ब्रिटिश एरवेझ यांच्या मदतीने सयुक्त चालत होती आणि त्यात एर मॉरिशसचा सहभाग 25% होता. सन 1972 पर्यन्त या कंपनीकडे फक्त भू सेवा करणेचे बंधन होते. ऑगष्ट 1972 मध्ये या कंपनीने स्वतःच्या अधिकारात सहा प्रवाशी Piper PA-31 Navjo वायु यान एर मादागासकर कडून ओले भाडेपट्ट्याने घेऊन मॉरिशसला राड्रिगस जोडून विमान उड्डाण चालू केले.हे वायु यान एर मॉरिशसचे चिन्ह वापरते पण कायदेशीर नोंदणी मालगासीत ठेवली आहे.सन 1973 मध्ये या कंपनीने ब्रिटिश विमान दळाचे Vickers VC10 भाड्याने घेऊन लंडन ते नैरोबी या दूरच्या प्रवासासाठी वापर करु शकली.तरीसुद्धा मुंबईसाठीची विमान सेवा मात्र एर इंडिया मार्फतच चालते.सन 1975 मध्ये 16 आसनी Twin Otter आले आणि त्याने Navajoची जागा घेतली. जेंव्हा एर फ्रांस आणि ब्रिटिश एर वेजचा करार संपला तेव्हा ब्रिटिश एर टूर बोइंग 707-400 या ओले भाडेपट्टयाने घेतलेल्या विमानाची स्वतःच्या अधिकारात दूर प्रवासासाठी मदत झाली.दी. 1-11-1977 रोजी लांब पल्याची विमान वाहतूक सुरू झाली.सन 1979 मध्ये दुसरे Twin Otter आले. एप्रिल 1980 पासून या कंपनीकडे 414 कर्मचारी आणि एक बोइंग 707-420, एक बोइंग 737-200,आणि दोन Twin Otter वाहतुकीसाठी उपलब्ध होती. त्याने मुंबई,लंडन,नैरोबी रेउनिओण,रोदृगुएस,रोम,आणि तंनणारिवे या ठिकाणची प्रवाशी आणि मालवाहतुक सेवा होत होती. या कंपनीने मालकीहक्क बादल केला. मॉरिशस सरकार 42.5% मुख्य भाग धारक झाले, त्यानंतर Rogers & Co. (17.5%), Air France & British Airways (15%) आणि Air India (10%) 1981 मध्ये एर मॉरिशस ने साऊथ आफ्रिकन एर वेजचे असणारे सेकंड हॅंड बोइंग 707-320B घेतले आणि बोइंग 707-400 ब्रिटिश Airtours परत करणेची परवानगी मिळवली.
नोवेंबर 1981 मध्ये एर मॉरिशस आणि एर मादागास्कर यांनी एकत्रित येऊन टनणारिवे –मॉरिशस – कोमोरोस – नैरोबी - आणि रेउनिओण - मॉरिशस ही सेवा मादागास्कर बोइंग 737 भाडेपट्ट्याने घेऊन चालू केली. सन 1980चे सुरुवातीस एर इंडिया आणि ब्रिटिश एरवेझचे कर्मचारी घेऊन बोइंग 737-320B वायु यान वापरून दरबान आणि जोहन्सबर्ग या मार्गावरील विमान वाहतुकीचे उद्घाटन केले.सन 1983 मध्ये युरोप खंडातील मार्गावर रोम आणि जुरिच पर्यन्त विस्तार आणि विमान सेवा चालविण्याची परवानगी मिळाल्याने लुकसाणा कडून दुसऱ्या पद्दतीचे वायु यान खरेदी केले.सन 1980 मध्ये त्यात पॅरिसची भर पडली.नोवेंबर 1984 मध्ये SAA कडून “Chateau de Reduit” नावाने ओळखले जाणारे बोइंग 747SP भाडेपट्ट्याने घेतले व लंडन पर्यन्त त्याची सेवा प सरविली.मार्च 1985 पर्यन्तयांच्या विमान तांड्यात बोइंग 707–320BS, बोइंग 737-200 ही दोन व बोइंग 747SP आणि Twin Otter यांचा समावेश झाला.त्या महिन्यात पहिली दोन बेल 206 जेट रेंजर कायदेशीर नोडविली होती.एप्रिल मध्ये 46 आसनी ATR42 वायु यान खरेदीची मागणी नोंदविली.आणि बोइंग 707चा वापर करून आठवड्यातून एक सेवा या पद्दतिने शिंगापूर विमान मार्ग वाढविला.त्याच वर्ष्याच्या जूनमध्ये आफ्रिकन विमानमार्ग संघाला एर मॉरिशस सामील झाले.
सन 1995 मध्ये ही विमान कंपनी मॉरिशसचे स्टॉक मार्केट मध्ये नोंदली.ज्या भागधारकांचे आधी 5% पेक्षा जादा भाग होते त्यांचा कंपनीत 51% सहभाग झाला आणि मॉरिशस सरकारचा 8.37% सहभाग राहीला आणि इतरांचा जो होता तोच सहभाग राहिला.
कर्मचारी
मॉरिशस विमान कंपनीत मार्च 2014 पर्यन्त 2309 कर्मचारी होते.
विमान संच
सध्याची प्रगति आणि भविष्यातील योजना
जुळी 2014 मध्ये एर मॉरिशस ने एर बस A350-900s सी मेमोऱ्यांडम ऑफ अन्डरस्टॅंडिंग सही केले त्यात ज्यादा तीन वायु यान स्वतःच्या अधिकारात निवड करण्याची अट ठेवून मागणी नोंदविली. सध्या एर मॉरिशसकडे खालील विमान संच आहे.
एर बस A319-100 | 2 | |
एर बस A330-200 | 2 | |
एर बस A340-300C | 4 | |
एर बस A340-300E | 2 | |
एर बस A350-900 (खरेदी नोंदविली) | 4 | |
एटीआर 72-500 | 2 | |
एकूण | 12 | 4 |
संदर्भ
- ^ "स्ट्रगलींग एअर मॉरिशस ऑपटीमिस्टिक ऑफ रिर्टन टू प्रॉफिटॉबिलिटी" (इंग्लिश भाषेत). 2013-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०५-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "प्रोफाईल फॉर एअर मॉरिशस" (इंग्लिश भाषेत). 2015-11-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०५-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "एअर मॉरिशस ची माहिती" (इंग्लिश भाषेत). 2015-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०५-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "एअर मॉरिशस विनस २०११ इनडियन ओशन लिडींग एअरलाईन" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2014-05-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ०५-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "वर्ल्ड एअरलाईन सर्वे - एअर मॉरिशस लिमिटेड" (इंग्लिश भाषेत). 2016-01-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०५-१०-१५ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)