Jump to content

एर जमैका

मायामीमधून उड्डाण केलेले एर जमैकाचे एक विमान

एर जमैका ही कॅरिबियनमधील जमैका देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. कॅरिबियन एरलाइन्स ह्या कंपनीच्या मालकीच्या असलेल्या एर जमैकाचे मुख्यालय किंग्स्टन येथील नॉर्मन मॅन्ली आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आहे. सध्या एर जमैकाच्या ताफ्यामध्ये ५ बोईंग ७३७ विमाने असून जमैकामधील किंग्स्टन व मॉंटेगो बे, अमेरिकेमधील फोर्ट लॉडरडेल, ओरलॅंडो व न्यू यॉर्क, कॅनडामधील टोरॉंटो तसेच बहामासमधील नासाउ ह्या शहरांना एर जमैकाद्वारे विमानसेवा पुरवली जाते.

बाह्य दुवे