एरिक बेट्झिग
= एरिक बेट्झिग | |
जन्म | १३ जानेवारी, १९६० ॲन आर्बर, मिशिगन, अमेरिका |
कार्यसंस्था | हॉवर्ड ह्युजेस वैद्यकीय संस्था |
प्रशिक्षण | कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉर्नेल विद्यापीठ |
ख्याती | सुपर-रिझॉल्व्ड फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी |
पुरस्कार | रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक (२०१४) |
रॉबर्ट एरिक बेट्झिग (Robert Eric Betzig; १३ जानेवारी, इ.स. १९६०:ॲन आर्बर, मिशिगन, अमेरिका - ) हा एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ आहे. सुपर-रिझॉल्व्ड फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी त्याला स्टेफान हेल व विल्यम मोएर्नर ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत २०१४ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.