Jump to content

एरबस

A 330-200 Air Seychelles 2013

एअरबस ही जगातली आघाडीची जेट विमान बनवणारी कंपनी आहे. या कंपनी मध्ये ५७००० लोक काम करतात. जगातल्या निम्म्याहून अधिक जेट विमानांचे उत्पादन ही कंपनी करते. या कंपनीचे मुख्यालय तौलूज (इंग्रजी Toulouse) फ्रान्स येथे आहे. विमानांच्या जुळणीचे काम फ्रान्स येथील तौलूज व जर्मनीतील हॅंबुर्ग (इंग्रजी Hamburg येथे चालते.

या कंपनीने एअरबस ए-३८० (इंग्रजी Airbus A380) हे अतिभव्य असे दुमजली अत्याधुनिक विमान बनवले आहे. या विमानाची चाचणीसाठीची पृथ्वी-प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. सिंगापूर एरलाइन्सने या विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण केले.

ही कंपनी अनेक इतर कंपन्यांमध्ये समाविष्ट झाली. त्यामुळे तिचे नाव आता एअरबस सास (इंग्रजी Airbus SAS) असे झाले आहे. या कंपनीची अनेक विमान उत्पादने आहेत उदा०

A300 दोन जेट इंजिने असलेले A330 तसेच चार इंजिनांचे A340 वगैरे.

एअरबस ए ३४०-५०० (इंग्रजी Airbus A340-500) हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे जास्तीत जास्त अंतर कापणारे विमानही एअरबसने बनवले आहे. पहिला क्रमांक बोइंग ७७७-२००एल आर (इंग्रजी Boeing 777-200LR) आहे.