Jump to content

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळूर)

एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
ಎಂ.ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ
एम्. चिन्नास्वामी स्टेडियम
मैदान माहिती
स्थानबंगळूर, कर्नाटक
स्थापना १९६९
आसनक्षमता ३८,३००[]
मालक कर्नाटक राज्य सरकार
प्रचालक कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना
यजमानकर्नाटक क्रिकेट संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारतीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.२२-२७ नोव्हेंबर १९७४:
भारत  वि. वेस्ट इंडीज
अंतिम क.सा.४-८ मार्च २०१७:
भारत  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा.२६ सप्टेंबर १९८२:
भारत वि. श्रीलंका
अंतिम ए.सा.२ नोव्हेंबर २०१३:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम २०-२०२५ डिसेंबर २०१२:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम २०-२०१ फेब्रुवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (कन्नड: ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ; रोमन लिपी: M. Chinnaswamy Stadium) हे भारतातील बंगळूर, कर्नाटक स्थित क्रिकेटचे मैदान आहे. नयनरम्य कब्बन पार्क, क्वीन्स रोड, कब्बन आणि उपनगरीय एम्.जी. रोड यांच्या कवेत आणि बंगळूर शहराच्या मध्यभागी वसलेले हे मैदान सुमारे चार दशके जूने आहे. पूर्वी ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) स्टेडियम म्हणून ओळखले जाई. नंतर एम. चिन्नास्वामी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव मैदानाला देण्यात आले. त्यांनी असोसिएशनची चार देशके सेवा केली तसेच ते १९७७ ते १९८० दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे अध्यक्ष सुद्धा होते. ३८,००० आसनक्षमता[] असलेले हे मैदान नियमित परणे कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, प्रथम वर्गीय क्रिकेट सामने आणि त्याच बरोबर इतर सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघांचे ते होम ग्राउंड आहे. मैदानाचे मालकी हक्क कर्नाटक राज्य सरकारकडे आहेत आणि ते सध्या ९९ वर्षांसाठी KSCAला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. चिन्नास्वामी मैदान हे भारतातील आणि कदाचित जगातील पहिले असे मैदान आहे, जेथे मोठ्या प्रमाणावर वीजेचे उत्पादन करण्यासाठी सौर पॅनेल बसवले गेले. KSCA ने "गो ग्रीन" उपक्रमाअंतर्गत हे पॅनेल बसवले.

इतिहास आणि विकास

कर्नाटक सरकारच्या पुढाकाराने मैदानाची कोनशीला १९६९ मध्ये बसविण्यात आली आणि १९७० मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले. १९७२-७३ च्या मोसमात मैदान प्रथम प्रथम-श्रेणी सामन्यांसाठी वापरले गेले. आणि वेस्ट इंडीच्या १९७४-७५ मोसमातील दौऱ्यावेळी मैदानाला कसोटी दर्जा मिळाला.

मैदानावर पहिली कसोटी २२ ते २९ नोव्हेंबर १९७४ दरम्यान खेळवली गेली. योगायोगाने, ही वेस्ट इंडीजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनीज यांची पदार्पणाची कसोटी होती. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजच्या संघाने मन्सूर अली खान पतौडीच्या भारतीय संघाचा २५६ धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने त्यांचा पहिला कसोटी विजय ह्याच मैदानावर १९७६-७७ च्या मोसमात टोनी ग्रेगचा इंग्लिश संघाविरुद्ध नोंदवला. मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ६ सप्टेंबर १९८२ रोजी खेळवला गेला. भारताने ह्या सामन्यान श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला.

ह्या मैदानावर १९९६ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्यांदा प्रकाश दिवे लावले गेले. प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दरम्यानचा उपांत्यपूर्व सामना. ९ मार्च १९९६ रोजी खेळवल्या गेलेल्या ह्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३९ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला. २००७ मध्ये, भारत आणि पाकिस्तान दरम्यान भारताची अवस्था ६१/४ अशी दयनीय झालेली असताना सौरव गांगुली आणि युवराज सिंगने ३०० धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडीत काढले. दिवसाच्या शेवटी भारताची धावसंख्या ३६५/५ अशी होती, की पूर्ण भारतात पहिल्या दिवसाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ह्या मैदानावरील ही सर्वोच्च भागीदारी आहे. ह्या मैदानावरील, सौरव गांगुलीच्या २३९ धावा ही डावखोऱ्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सन २००० मध्ये बीसीसीआयने बंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे केंद्र घोषित केल्यानंतर, ह्या मैदानावरील ह्या अकादमीमधून अनेक क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. मिस वर्ल्ड १९९६ कार्यक्रम ह्याच मैदानावर पार पडला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने मैदानाची क्षमता ७०,००० पर्यंत वाढविण्याचे नियोजित केले आहे. त्याशिवाय ७० ते ८० हजार आसनक्षमतेचे आणखी एक क्रिकेट मैदान तयार करण्याचे सुद्धा ठरवले आहे. परंतू, आजपर्यंत ह्यापैकी कोणतीही योजना आजवर अंमलात आली नाही. बंगळूर फ्रँचायझी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे हे होम ग्राउंड आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याला कर्नाटकचे निशाण आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या लाल आणि पिवळ्या रंगात रंगविले गेले.

चिन्नास्वामी मैदानाचे प्रकाशझोतातील विहंगम दृश्य.

आकडेवारी आणि विक्रम

प्रकार कसोटी एकदिवसीय टी२०
सर्वात मोठी धावसंख्याभारतचा ध्वज भारत ६२६ वि पाकिस्तानभारतचा ध्वज भारत ३८३/६ वि ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत २०२/६ वि इंग्लंड
सर्वात लहान धावसंख्याभारतचा ध्वज भारत २१४ वि पाकिस्तानभारतचा ध्वज भारत १६६/४ वि इंग्लंडश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२२/९ वि वेस्ट इंडीज
सर्वोत्कृष्ट फलंदाजीपाकिस्तान युनिस खान २६७ वि भारतभारत रोहित शर्मा २०९ वि ऑस्ट्रेलियावेस्ट इंडीज आंद्रे फ्लेचर ८४* वि श्रीलंका
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीभारत हरभजन सिंग ११/२२४ वि ऑस्ट्रेलियाभारत युवराजसिंग ५/३१ वि आयर्लंडभारत युझवेंद्र चहल ६/२५
सर्वात मोठी भागीदारीपाकिस्तान युनिस खान व इंझमाम उल हक ३२४ वि भारतऑस्ट्रेलिया शेन वॉटसन व ब्रॅड हॅडिन १८३ वि कॅनडापाकिस्तान मोहम्मद हफीझशोएब मलिक १०६ वि भारत
सर्वाधिक धावाभारत सचिन तेंडूलकर ८६९भारत सचिन तेंडूलकर ५३४भारत सुरेश रैना १०३
सर्वाधिक बळीभारत अनिल कुंबळे ४१भारत झहीर खान १४भारत युझवेंद्र चहल ६

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२२-२७ नोव्हेंबर १९७४भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२६७ धावाधावफलक
२८ जानेवारी-२ फेब्रुवारी , १९७७भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत१४० धावाधावफलक
१५-२० डिसेंबर, १९७८भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजअनिर्णितधावफलक
१९-२४ सप्टेंबर, १९७९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
२१-२६ नोव्हेंबर, १९७९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
९-१४ डिसेंबर, १९८१भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
१४-१९ सप्टेंबर, १९८३भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
१३-१७ मार्च, १९८७भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१६ धावाधावफलक
१२-१७ नोव्हेंबर, १९८८भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत१७२ धावाधावफलक
२६-३० जानेवारी, १९९४भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारतडाव आणि ९५ धावाधावफलक
१८-२० ऑक्टोबर, १९९५भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक
२५-२८ मार्च, १९९८भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया८ गडीधावफलक
२-६ मार्च, २०००भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाडाव आणि ७१ धावाधावफलक
१९-२३ डिसेंबर, २००१भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअनिर्णितधावफलक
६-१० ऑक्टोबर, २००४भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२१७ धावाधावफलक
२४-२८ मार्च, २००५भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१६८ धावाधावफलक
८-१२ डिसेंबर, २००७भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानअनिर्णितधावफलक
९-१३ ऑक्टोबर, २००८भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाअनिर्णितधावफलक
९-१३ ऑक्टोबर, २०१०भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
३१ ऑगस्ट-३ सप्टेंबर, २०१२भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
१४-१८ नोव्हेंबर, २०१५भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाअनिर्णितधावफलक
४-८ मार्च, २०१७भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत७५ धावाधावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२६ सप्टेंबर १९८२भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
२० जानेवारी १९८५भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड३ गडीधावफलक
१४ ऑक्टोबर १९८७भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत१६ धावाधावफलक
२७ ऑक्टोबर १९८९भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत३ गडीधावफलक
२६ फेब्रुवारी १९९३भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड४८ धावाधावफलक
१० नोव्हेंबर १९९३दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेno resultधावफलक
०९ मार्च १९९६भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारत३९ धावाधावफलक
२१ ऑक्टोबर १९९६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत२ गडीधावफलक
१४ मे १९९७भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक
२० मे १९९८भारतचा ध्वज भारतकेन्याचा ध्वज केन्याभारतचा ध्वज भारत४ गडीधावफलक
०४ एप्रिल १९९९भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१२३ धावाधावफलक
२५ मार्च २००१भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत६० धावाधावफलक
१२ नोव्हेंबर २००३भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया६१ धावाधावफलक
१९ नोव्हेंबर २००५भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
०६ जून २००७आफ्रिका XIआशिया XIआशिया XI३४ धावाधावफलक
२९ सप्टेंबर २००७भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाno resultधावफलक
२३ नोव्हेंबर २००८भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत१९ धावाधावफलक
०७ डिसेंबर २०१०भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
२७ फेब्रुवारी २०११भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबरोबरीधावफलक
०२ मार्च २०११इंग्लंडचा ध्वज इंग्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड३ गडीधावफलक
०६ मार्च २०११भारतचा ध्वज भारतआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
१३ मार्च २०११ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकेन्याचा ध्वज केन्याऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया६० धावाधावफलक
१६ मार्च २०११ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकॅनडाचा ध्वज कॅनडाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया७ गडीधावफलक
०२ नोव्हेंबर २०१३भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत५७ धावाधावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२५ डिसेंबर २०१२भारतचा ध्वज भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान५ गडीधावफलक
२० मार्च २०१६श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज७ गडीधावफलक
२१ मार्च २०१६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाबांगलादेशचा ध्वज बांगलादेशऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया३ गडीधावफलक
२३ मार्च २०१६भारतचा ध्वज भारतबांगलादेशचा ध्वज बांगलादेशभारतचा ध्वज भारत१ धावधावफलक
०१ फेब्रुवारी २०१७भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत७५ धावाधावफलक

प्रतिमासंग्रह

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "एम्. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "बीसीसीआय". http://www.bcci.tv/venues/4/m-chinnaswamy-stadium (इंग्रजी भाषेत). 2021-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "महान भारतीय गोलंदाज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "फिरोजशाह कोटला, दिल्ली / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे