एम.जी.के. मेनन
Indian physicist | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Mambillikalathil Govind Kumar Menon | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट २८, इ.स. १९२८ मंगळूर | ||
मृत्यू तारीख | नोव्हेंबर २२, इ.स. २०१६ नवी दिल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
Doctoral advisor | |||
व्यवसाय | |||
नियोक्ता | |||
सदस्यता |
| ||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
कार्यक्षेत्र | |||
पुरस्कार |
| ||
| |||
मंबिल्लिकलातिल गोविंद कुमार मेनन तथा एम.जी.के. मेनन (२८ ऑगस्ट, इ.स. १९२८:मंगळूरु, कर्नाटक, भारत - ) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वैश्विक किरणांचा उपयोग करून मूलभूत कणांवर टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये संशोधन केले. विज्ञान मुत्सद्दी एम.जी.के मेनन यांचे 22 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव माबिलिकलाथिल गोविंद कुमार मेनन होय. त्यांना 1961 मध्ये पद्मश्री, 1968 मध्ये पद्मभूषण, 1985 मध्ये पद्मविभूषण हे तिने पद्म पुरस्कार प्राप्त झाले. १९६०चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला.
जीवन
होमी बाबा यांच्या आग्रहास्तव 1955 मध्ये ते टाटा वेळी ही मूलभूत संशोधन संस्थेत दाखल झाले. त्यावेळी संस्था नुकतीच बेंगलोरहून मुंबई हलवली होती. 1966 मध्ये विमान अपघातात भाभा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हा टाटा मूलभूत संस्थेच्या संचालकपदी जेआरडी टाटांनी नेमणूक केली.
त्यावेळी ते ३८ वर्षाचे होते. 1975 पर्यंत मेनन या संस्थेचे संचालक राहिले. या संस्थेत असतानाच थोर संशोधक सी. व्ही. रामन यांनी मेनन यांना रामन ट्रस्टवर नेमले होते. त्यामुळे रामन यांच्या निधनानंतर राम रिसर्च या संस्थाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर पडली.
दोन दशकाहून अधिक कालावधीत त्यांनी भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरण निर्मिती महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम साराभाई यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आग्रहास्तव भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1972 मध्ये नऊ महिने काम केले.
1974 मध्ये संरक्षण मंत्र्यांची वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. 1974 ते 1978 या काळात ते संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. १९७८ मध्ये केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि 1980 मध्ये पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी नियुक्त करण्यात आली.
पद
1982 ते 1989 या कालावधीत नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर 1980 ते 1989 या कालावधीत ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार राहिले. 1989 ते 1990 दरम्यान मेनन यांनी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सरकारच्या मंत्रिमंडळात 1989 मध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्री पद भूषवले. 1990 ते 1996 या कालावधीत राज्यसभेचे खासदारही होते.
पुरस्कार
मेनन १९७२मध्ये काही काळ इस्रोचे चेरमन होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार दिले गेले.