Jump to content

एम.के. कनिमोळी

एम.के कनिमोळी ही कोट्यवधी रूपयांच्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अटक झालेली डीएमकेची खासदार आहे. यांना २० मे २०११ रोजी अटक झाली. पतियाळा हाऊस येथील विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला व त्यानंतर त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली.[] या २G स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भात एकूण तीन खटले सुरू आहेत. त्यापैकी दोन सीबीआयच्या कोर्टात, तर तिसरा अंमलबजावणी संचलनालयाकडे आहे. या प्रकरणातील पहिल्या खटल्याचा निकाल २० डिसेंबर २०१७ रोजी आला व सर्व आरोपी निर्दोष सुटले. दिल्लीतील सीबीआय कोर्टाने यासंदर्भात निर्णय दिला.[] या निकाला नंतर “माझी मैत्रीण कन्नीसाठी मला खूप आनंद झालाय. अखेर न्याय मिळाला.”, अशा शब्दात भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी कनिमोळींसोबतचा फोटोही ट्वीट केला.[]

संदर्भ

  1. ^ कनिमोळींची रवानगी जेलमध्ये[permanent dead link]
  2. ^ "2G घोटाळा : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष". 2017-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-21 रोजी पाहिले.
  3. ^ माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला : सुप्रिया सुळे[permanent dead link]