एम.एच. अंबरीश
मलवळ्ळी हुचेगौडा अंबरीश (एम.एच. अंबरीश) ( नोव्हेंबर ३०,इ.स. १९५१) हे भारत देशातील राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील मंडया लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.