एमिली ब्लंट
एमिली ब्लंट | |
---|---|
एमिली ब्लंट | |
जन्म | २३ फेब्रुवारी १९८३ लंडन, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | इंग्रजी |
पुरस्कार | गोल्डन ग्लोब पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार |
पती | जॉन क्रझीन्स्की |
एमिली ऑलीव्हिया लॉरा ब्लंट (जन्म- २३ फेब्रुवारी १९८३) ह्या एक ब्रिटिश अभिनेत्री आहेत.[१] त्यांना आत्तापर्यंत एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाला आहेत. ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारासाठी त्यांना दोन नामांकने मिळाली आहेत.[२]
सुरुवातीचे आयुष्य
एमिली ह्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी लंडन बरो ऑफ वोन्ड्सवर्थ येथे झाला. जोआना ब्लंट, पूर्वीच्या अभिनेत्री आणि शिक्षिका आणि बरीस्टर ऑल्हीवर ब्लंट, ह्यांच्या त्या कन्या आहेत. फेलीसिटी, सेबॅस्टीयन आणि सुसाना ही त्यांची भावंड आहेत.[३]
कारकीर्द
नोव्हेंबर २००१ मध्ये, ब्लंट ह्यांनी पीटर्स हॉल निर्मित 'द रॉयल फॅमिली' ह्या नाटकामधून पदार्पण केले.[४] त्यांच्या ह्या कामासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण ह्या पुरस्कारानी इव्हनिंग स्टँडर्डकडून सन्मानित केले गेले.त्यानंतर, ब्लंट ह्यांनी गीडीयनस् डॉटर ह्या ब्रिटिश सेरीयल मध्ये काम केले. त्यातील कामासाठी ब्लंट ह्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी-'सिरीज, मिनिसीरीज, टेलिव्हिजन फिल्म' गोल्डन ग्लोब पुरस्कार.[५] त्यानंतर त्यांनी 'द डेव्हिल वेअर्स प्राडा' ह्या विनोदी चित्रपटात काम केले. ब्लंट ह्यांनी न्यू यॉर्कमधील रनवे मॅगझीनच्या मुख्य संपादक, मिरांडा प्रेस्त्ली ह्यांची सहाय्यक म्हणून काम केले. ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब पुरस्काराची नामांकने मिळाली. २०१७ साली, ब्लंट ह्यांनी रॉब मार्शल ह्यांच्या 'मेरी पॉपीन्स रिटर्न्स' ह्या म्युझिकलमध्ये मेरी पॉपीन्सची भूमिका केली. त्यांना अ क्वायेट प्लेस आणि मेरी पॉपीन्स रिटर्न्स ह्यातील भूमिकांसाठी दोन सॅज पुरस्कारासाठी नामांकने मिळाली. आणि 'अ क्वायेट प्लेस' साठी पुरस्कार मिळाला.[६][७]
वैयक्तिक जीवन
एमिली ह्या अमेरिकन अभिनेते जॉन क्रझीन्स्की ह्यांच्याशी विवाहित आहेत. त्यांना दोन कन्या आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Emily Blunt | Biography, Movies, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2021-04-21 रोजी पाहिले.
- ^ "Emily Blunt". TVGuide.com (इंग्रजी भाषेत). 2021-04-21 रोजी पाहिले.
- ^ Taylor, Ella (2009-02-27). "The New York Times" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.
- ^ "Emily Blunt Biography - Yahoo! Movies". web.archive.org. 2013-03-07. रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-03-07. 2021-04-21 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Into the Woods". www.goldenglobes.com. 2021-04-21 रोजी पाहिले.
- ^ "BAFTA Awards Search | BAFTA Awards". awards.bafta.org. 2021-04-21 रोजी पाहिले.
- ^ Acuna, Kirsten. "Emily Blunt won her first SAG Award for 'A Quiet Place,' and husband John Krasinski had the best reaction". Insider (इंग्रजी भाषेत). 2021-04-21 रोजी पाहिले.