एफाटे
एफाटे (इंग्लिश: Éfaté ;) प्रशांत महासागरातील व्हानुआतु देशाच्या शेफा प्रांतातील बेट आहे. हे बेट व्हानुआतुमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तर क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचे बेट आहे. याच्या ९०० किमी२ क्षेत्रफळात अंदाजे ५०,००० व्यक्ती राहतात. यातील बहुतांश व्यक्ती पोर्ट व्हिला या राजधानीच्या शहरात राहतात. या बेटावरील सर्वोच्च बिंदू माउंट मॅकडोनाल्ड ६४७ मी उंचीवर आहे. याला इले व्हाते असेही नाव आहे.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथे अमेरिकेचा महत्त्वाचा सैनिकी तळ होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत