एप्रिल ६
एप्रिल ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९६ वा किंवा लीप वर्षात ९७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६५६ - शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड किल्ला ताब्यात घेतला.
एकोणिसावे शतक
- १८१४ - पदच्युत झालेल्या नेपोलियन बोनापार्टची एल्बाला रवानगी.
- १८९६ - पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन. रोमन सम्राट थेडोसियस पहिल्याने घातलेल्या बंदीमुळे १,५०० वर्षे हे खेळ बंद होते.
विसावे शतक
- १९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेची जर्मनीवर युद्ध घोषणा.
- १९१९ - महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन .
- १९३० - दांडीयात्रेच्या समाप्तीनंतर महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
- १९६५ - अमेरिकेने अर्ली बर्ड हा संदेशबवाहक उपग्रह प्रक्षेपित केला.
- १९६६ - भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व श्रीलंकेच्या मधील पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
- १९७३ - गुरू, शनी, सौर वारे आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करणारे पायोनियर-११ अवकाशात प्रक्षेपित केले गेले.
- १९८० - अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षपदाखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.
- १९९८ - पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.
- १९९८ - स्तनांचा कर्करोग बरा करणाऱ्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
एकविसावे शतक
- २००० - मिर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळा आणि सोयुझ अंतराळयान एकमेकांना जोडले गेले.
- २०१० - नक्षलवाद्यांशी लढताना दांतेवाडा जिल्ह्यात ७६ सीआरपीएफ जवानांना वीरमरण.
जन्म
- १७७३ - जेम्स मिल, स्कॉटिश तत्त्ववेत्ता, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ.
- १८६४ - सर विल्यम हार्डी, ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.
- १८९० - अँटनी फोक्कर, फोक्कर एरक्राफ्टचा स्थापक.
- १८९० - अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी, उर्दू कवी.
- १८९२ - डोनाल्ड विल्स डग्लस, डग्लस एरक्राफ्ट कंपनीचा स्थापक.
- १९०९ - जी.एन. जोशी, भावगीतगायक व संगीतकार.
- १९१७ - हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु, मराठी कथाकार व कवी.
- १९१९ - रघुनाथ विष्णू पंडित, कोंकणी कवी.
- १९२७ - विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग, मराठी उद्योजक.
- १९२८ - जेम्स वॉटसन, फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारा नोबेल पारितोषिक विजेता जैवरसायनशास्त्रज्ञ.
- १९३१ - रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन, बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९३३ - पी.के. नायर, नॅशनल फिल्म आर्काईव्ह्जचे संस्थापक.
- १९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेट खेळाडू व प्रबंधक.
- १९७१ - संजय सुरी, चित्रपट अभिनेता, निर्माता.
- १९६४ - डेव्हिड वुडर्ड, अमेरिकन लेखक आणि संगीत कंडक्टर.
मृत्यू
- १५२८ - आल्ब्रेख्त ड्यूरर, जर्मन चित्रकार.
- १९५५ - धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर
- १९८३ - जनरल जयंतो नाथ चौधरी, भारताचे लष्करप्रमुख (१९६२]] - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८]] - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण
- १९८९ - पन्नालाल पटेल, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबऱ्या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे.
- १९९२ - आयझॅक असिमॉव्ह, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक.
प्रतिवार्षिक पालन
भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ४ - एप्रिल ५ - एप्रिल ६ - एप्रिल ७ - एप्रिल ८ - (एप्रिल महिना)