एप्रिल २९
एप्रिल २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११९ वा किंवा लीप वर्षात १२० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
- १९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
- १९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
- १९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
- १९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
- १९९२ : लॉस ॲंजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
- १९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
- १९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.
एकविसावे शतक
जन्म
- १७४५ - ऑलिव्हर एल्सवर्थ, अमेरिकेचे तिसरा सरन्यायाधीश.
- १८४८ - राजा रविवर्मा, भारतीय चित्रकार.
- १८६७ - डॉ. शंकर आबाजी भिसे, भारतीय वैज्ञानिक.
- १९०१ - मिचेनोमिया हिरोहितो, दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट.
- १९१९ - अल्लारखा, भारतीय तबलावादक.
- १९२५ - जॉन कॉम्पटन, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
- १९३३ - मार्क आयस्केन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.
- १९३६ - झुबिन मेहता, भारतीय संगीतकार.
- १९६६ - फिल टफनेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - आंद्रे अगासी, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९७० - उमा थर्मन, अमेरिकन चित्रपटअभिनेत्री.
- १९७९ - आशिष नेहरा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९४५ - हाइनरिश हिमलर, जर्मन नाझी अधिकारी.
- १९६० - पं. बालकृष्ण शर्मा, हिंदी कवी.
- १९८० - श्रीकृष्ण के. क्षीरसागर, मराठी लेखक आणि समीक्षक.
- १९८० - सर आल्फ्रेड हिचकॉक, इंग्लिश चित्रपट दिग्दर्शक.
- १९९९ - मोहन गोखले, भारतीय अभिनेता.
- २००६ - जे.के. गालब्रेथ, कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ.
- २०२० - इरफान खान, भारतीय अभिनेता
प्रतिवार्षिक पालन
- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
- वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड वर्धापनदिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - (एप्रिल महिना)