एप्रिल २६
एप्रिल २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११६ वा किंवा लीप वर्षात ११७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पंधरावे शतक
- १४७८ - इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.
सतरावे शतक
एकोणिसावे शतक
- १८०२ - नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.
- १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.
- १८६५ - अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
विसावे शतक
- १९०३ - अटलेटिको माद्रिद या असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
- १९२४ - रमाबाई रानडे यांचे निधन.
- १९२५ - पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९३३ - जर्मनीची गुप्त पोलीस यंत्रणा गेस्टापोची रचना.
- १९३७ - जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.
- १९४२ - मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.
- १९५६ - भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे नेपानगर येथे उदघाटन.
- १९६२ - नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
- १९६४ - टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.
- १९७० - सुएझ कालव्याच्या परिसरात इजिप्त व इस्त्रायल यांचे हवाई हल्ले सुरू झाले.
- १९७३ - अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
- १९८१ - डॉ. मायकेल हॅरिसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.
- १९८६ - युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.
- १९८९ - बांगलादेशमध्ये चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
- १९९४ - चायना एरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळून २६४ ठार.
- १९९५ - भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.
एकविसावे शतक
- २००२ - जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलीस अधिकाऱ्याला ठार मारले.
- २००५ - २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.
जन्म
- १२१ - मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
- ५७० - मुहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचे संस्थापक.
- १४७९ - वल्लभाचार्य पुष्टिमार्गाचे संस्थापक.
- १५६४ - विल्यम शेक्सपियर, इंग्लिश नाटककार आणि अभिनेता.
- १६४८ - पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८९४ - रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.
- १९०० - चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
- १९०८ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- १९१७ - आय.एम.पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.
- १९५३ - मौशमी चॅटर्जी, भारतीय अभिनेत्री.
- १९६३ - जेट ली, चीनी अभिनेता.
मृत्यू
- ११९२ - गो-शिराकावा, जपानी सम्राट.
- १४८९ - अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.
- १९२० - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
- १९२४ - रमाबाई रानडे, मराठी लेखिका आणि समाजसुधारक.
- १९३२ - विल्यम लॉकवुड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू, मराठी साहित्यिक.
- १९८७ - शंकरसिंग रघुवंशी, शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार.
- १९९९ - मनमोहन अधिकारी, लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- एकत्रीकरण दिन - टांझानिया.
- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - (एप्रिल महिना)