Jump to content

एप्रिल २४

एप्रिल २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११४ वा किंवा लीप वर्षात ११५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

इ.स.पू. बारावे शतक

  • ११८४ - शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा (ट्रोजन हॉर्स) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या ट्रॉयचा वेढा संपवला.

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

  • १८०० - लायब्ररी ऑफ कॉॅंग्रेसची स्थापना.
  • १८६३ - कीझव्हिलची कत्तल - कॅलिफोर्नियातील कीझव्हिल येथे ५३ स्थानिक अमेरिकन व्यक्तिंची हत्त्या.

विसावे शतक

  • १९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रॅंक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.
  • १९१५ - आर्मेनियन वंशहत्या - कॉन्स्टेन्टिनोपलमध्ये सुरू झालेली आर्मेनियन वंशीय व्यक्तिंचे हत्याकांड नंतर ओट्टोमन साम्राज्यभर पसरले.
  • १९२२ : ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.
  • १९५५ - बांडुंगची सभा समाप्त. २९ देशांच्या या सभेत पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला गेला.
  • १९६७ - रशियाचे अंतराळयान सोयुझ १ कोसळले. अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी.
  • १९६८ - मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.
  • १९७० - चीनचा पहिला मानवनिर्मित उपग्रह डॉॅंग फॅंग हॉॅंग १चे प्रक्षेपण.
  • १९७० - गाम्बिया प्रजासत्ताक झाले.
  • १९७० : चीनचा पहिला उपग्रह 'डॉॅंग फॅंग हॉॅंग-१'चे प्रक्षेपण
  • १९७५ - स्टॉकहोममध्ये बाडर-माइनहॉफ टोळीने पश्चिम जर्मनीची वकीलात उडवली.
  • १९८० - ईराणमध्ये ओलिस असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना सोडवण्याच्या निष्फळ प्रयासात ८ अमेरिकन सैनिक ठार.
  • १९८१ - आय.बी.एम.ने सर्वप्रथम वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
  • १९९० - हबल दुर्बीणीचे प्रक्षेपण.
  • १९९३ - आय.आर.ए.ने लंडनच्या बिशप्सगेट भागात बॉम्बस्फोट घडवला.
  • १९९३: इंडियन एरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.

एकविसावे शतक

  • २००४ - अमेरिकेने लिब्यावर १८ वर्षांपूर्वी घातलेले आर्थिक निर्बंध दूर केले.
  • २००५ - कार्डिनल जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोप पदी.
  • २००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
  • २००६ - नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेली संसदीला पुनः मान्यता दिली.
  • २००७ - नॉर्वेने युद्ध सुरू नसताना आइसलॅंडचे रक्षण करण्याचे कबूल केले.
  • २०१३ - बांगलादेशची राजधानी ढाकाच्या उपनगरातील इमारत कोसळून १,१२७ व्यक्ती ठार. २,५००पेक्षा अधिक जखमी.
  • २०१७- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले .

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • प्रजासत्ताक दिन - गाम्बिया.
  • वंशहत्त्या स्मृती दिन - आर्मेनिया.
  • काप्यॉॅंग दिन - ऑस्ट्रेलिया.
  • जागतिक प्रयोगशाळा-प्राणी दिन
  • भारतीय जलसंपत्ती दिन.
  • लोकशाही दिन : नेपाळ
  • जागतिक शिल्पकला दिन
  • भारतीय पंचायती राज दिन

बाह्य दुवे


एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - (एप्रिल महिना)