एप्रिल २१
एप्रिल २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १११ वा किंवा लीप वर्षात ११२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
इ.स.पू. आठवे शतक
- ७५३ - रोम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.
सोळावे शतक
- १५२६ - इब्राहिमखान लोदी आणि बाबर यांच्यात पानिपतची पहिली लढाई, बाबराचा विजय, मुघल साम्राज्याची भारतात स्थापना.
सतरावे शतक
- १६५९ - शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट.
अठरावे शतक
- १७२० - बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर पहिला बाजीराव पेशवेपदी.
- १७८२ - राजा बुद्ध योद्फा चुलालोक याने रात्तानकोसिन शहराची (बँकॉक) पायाभरणी केली.
- १७९२ - ब्राझिलच्या स्वातंत्र्यसेनानी तिरादेन्तेसचा वध.
एकोणिसावे शतक
- १८३६ - सान जेसिंटोची लढाई - सॅम ह्युस्टनच्या नेतृत्वाखालील टेक्सासच्या सैन्याने मेक्सिकन सैन्याला हरवले.
विसावे शतक
- १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या रेड बेरोन नावाने ओळखला जाणाऱ्या लढाऊ वैमानिक मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा लढाईत अंत.
- १९३० - कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.
- १९३२ - नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
- १९४४ - फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
- १९६० - ब्राझीलची राजधानी रियो दि जानेरोहून ब्राझीलियाला हलवण्यात आली.
- १९६६ - इथियोपियाच्या हेल सिलासीचे जमैकात आगमन. रासतफारी पंथातील एक महत्त्वाची घटना.
- १९६७ - ग्रीसमध्ये कर्नल जॉर्ज पापादोपोलसने सत्ता बळकावली.
- १९७२ - अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
- १९७५ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष जुआन लॉकचे सैगोनहून पलायन.
- १९८७ - श्रीलंकेत कोलंबो येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
- १९८९ - चीनची राजधानी बीजिंगच्या त्येनानमेन चौकात १,००,००० विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली.
- १९९२ - सौरमालेबाहेरच्या PSR 1257+12 या पल्सारभोवती फिरणाऱ्या पहिल्या ग्रहाचा शोध.
- १९९७ - भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
- २००० - आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात आणला.
- २००९ - हत्तीगोठा (ता. धानोरा) इथे नक्षलवाद्यांनी गस्ती पथकावर हल्ला करून १६ पोलिसांची हत्या केली.
एकविसावे शतक
जन्म
- १७२९ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १८६४ - मॅक्स वेबर, जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ.
- १९०९ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.
- १९१० - आर.सी. तलवार, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
- १९२६ - एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी.
- १९३४ - डॉ. गुंथर सोन्थायमर, महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक.
- १९३६ - जेम्स डॉब्सन, ख्रिस्ती धर्मप्रसारक.
- १९४४ - ग्विटी नोविन, इराणी-कॅनेडियन चित्रकार, ग्राफिक संकल्पक.
- १९४५ - श्रीनिवासराघवन वेंकटराघवन, भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच.
- १९५० - शिवाजी साटम, भारतीय अभिनेता.
- १९७६ - शब्बीर अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ७४८ - गेन्शो, जपानी सम्राज्ञी.
- १०१३ - पोप अलेक्झांडर दुसरा.
- १५०९ - सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.
- १९१० - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १९१८ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- १९३८ - मुहम्मद इकबाल, भारतीय कवी.
- १९६४ - भारतीदासन, द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी.
- १९७१ - फ्रांस्वा डुव्हालिये, हैतीचा हुकुमशहा.
- १९७३ - आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- १९८५ - टॅंक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- २०१३ - शकुंतलादेवी, गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला.
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)