Jump to content

एप्रिल २०

एप्रिल २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०९ वा किंवा लीप वर्षात ११० वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

  • १६५७ - न्यू यॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.

अठरावे शतक

  • १७४९: मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणाऱ्या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
  • १७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
  • १७९२ - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१४ - लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकऱ्यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
  • १९३९: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुटी देऊन साजरा करण्यात आला.
  • १९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
  • १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.
  • १९४६: राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
  • १९६७ - स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.
  • १९६८ - साउथ आफ्रिकन एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
  • १९६८ - पिएर त्रूदो कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
  • १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
  • १९७८ - सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एर फ्लाइट ९०२ या बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
  • १९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली ॲंटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
  • १९९८ - एर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.
  • १९९९ - कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्मह्त्या केली.

एकविसावे शतक

  • २००४ - युटिका, इलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.
  • २००४ - इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.

बाह्य दुवे

एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)