एप्रिल १८
एप्रिल १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०८ वा किंवा लीप वर्षात १०९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अकरावे शतक
चौदावे शतक
- १३३६ - हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना केली.
सोळावे शतक
अठरावे शतक
- १७०३ - औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.
- १७२० - शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
एकोणिसावे शतक
- १८३१ - युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामाची स्थापना झाली.
- १८५३ - मुंबईहून ठाण्यापर्यंत रेल्वे सेवा नियमितपणे सुरू झाली.
- १८८० - मार्शफील्ड, मिसूरी येथे एफ.४ टोर्नेडो. ९९ ठार, २०० जखमी.
- १८९८ - ब्रिटिश लश्करी अधिकारी व प्लेग नियंत्रक रॅंड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
विसावे शतक
- १९०६ - कॅलिफोर्नियात सान फ्रांसिस्को येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
- १९१२ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यू यॉर्कला पोचले.
- १९२३ - छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील पहिला अर्धपुतळा पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला स्थापन करण्यात आला.
- १९२४ - सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.
- १९३० - भारतीय क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.
- १९३० - आज काहीही बातमी नाही असे बी.बी.सी. या नभोवाणी केंद्रावरून सांगण्यात आले.
- १९३६ - पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - पिएर लव्हाल विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून जर्मनीतील हेलिगोलॅंड हे बेट उद्ध्वस्त केले.
- १९४६ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित.
- १९५० - आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
- १९५४ - गमाल अब्दल नासरने ईजिप्तमध्ये सत्ता बळकावली.
- १९७१ - एर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ प्रकारचे विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
- १९७५ - भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आर्यभट्टचे प्रक्षेपण.
- १९८० - झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८३ - बैरुतमध्ये अमेरिकेच्या वकीलातीवर आत्मघातकी हल्ला. अनेक सैनिकांसह ६३ ठार.
- १९९२ - अफगाणिस्तानमध्ये जनरल अब्दुल रशीद दोस्तमने अहमद शाह मसूदशी हातमिळवणी करून राष्ट्राध्यक्ष नजिबुल्लाह विरुद्ध उठाव केला.
- १९९६ - लेबेनॉनच्या कानामधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतींवर इस्रायेलचा हल्ला. १०२ नागरिक ठार.
एकविसावे शतक
- २००१ - भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1चे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
- २००७ - क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटनेत ३२ चिनी कामगार होरपळून मृत्युमुखी.
जन्म
- १५९० - पहिला एहमेद.
- १७७४ - सवाई माधवराव पेशवे.
- १८५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न, स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह पुरस्कर्ते समाजसुधारक.
- १९०२ - ज्युसेप्पे पेला, इटलीचा पंतप्रधान.
- १९१० - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
- १९१६ - ललिता पवार, हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री.
- १९४७ - जेम्स वूड्स, अमेरिकन अभिनेता.
- १९५४ - रिक मोरानिस, केनेडियन अभिनेता.
- १९५८ - माल्कम मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - पूनम धिल्लन, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९६३ - कॉनन ओब्रायन, अमेरिकन अभिनेता, निर्माता व मुलाखतकार.
मृत्यू
- १८५९ - रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे, १८५७ च्या युद्धातील सेनापती.
- १९४३ - इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.
- १९४५ - जॉन ॲम्ब्रोस फ्लेमिंग, व्हॅक्यूम ट्यूबचा शोधक.
- १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७२ - महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक,
- १९९५ - पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते, पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक.
- २००२ - थॉर हायरडाल, नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.
- २००२ - शरद दिघे, महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष.
- २००४ - रतु सर कामिसेसे मारा, फिजीचा प्रथम पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - झिम्बाब्वे.
- सेना दिन - इराण.
- जागतिक वारसा दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - (एप्रिल महिना)