एप्रिल १६
एप्रिल १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०६ वा किंवा लीप वर्षात १०७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणविसावे शतक
- १८५३ - भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.
- १८६२ - इमॅन्सिपेशन अॅक्ट अन्वये अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली.
विसावे शतक
जन्म
- ७७८ - भक्त लुई.
- १३१९ - जॉन दुसरा, फ्रांसचा राजा.
- १६९३ - ऍन सोफी रेव्हेंटलो, डेन्मार्क व नॉर्वेची राणी.
- १७२८ - जोसेफ ब्लॅक, स्कॉटलॅंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १७३८ - हेन्री क्लिंटन, ब्रिटिश सेनापती.
- १८२३ - फर्डिनांड आयझेनस्टाइन, जर्मन गणितज्ञ.
- १८४४ - ऍनातोले फ्रांस, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १८४८ - कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक.
- १८६७ - विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक.
- १८८९ - चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार.
- १९२१ - पीटर उस्तिनोव, इंग्लिश चित्रपटअभिनेता.
- १९२४: भारतीय राजनयिक मदनजीत सिंग
- १९२७ - पोप बेनेडिक्ट सोळावा.
- १९३४ - राम नाईक, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री
- १९४६ - मार्गो ऍडलर, अमेरिकन पत्रकार.
- १९४७ - करीम अब्दुल-जब्बार, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
- १९६५ - मार्टिन लॉरेंस, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९७२ - कोंचिता मार्टिनेझ, टेनिस खेळाडू.
- १९७८ - लारा दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
- १९६६: नंदलाल बोस, शांतीनिकेतन मधील जगविख्यात चित्रकार
- २०००: अप्पासाहेब पवार, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
प्रतिवार्षिक पालन
- World Voice Day
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - (एप्रिल महिना)