Jump to content

एप्रिल १४

एप्रिल १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०४ वा किंवा लीप वर्षात १०५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

इ.स.पू. पहिले शतक

  • ४३ - फोरम गॅलोरमची लढाई - ज्युलियस सीझरचा मारेकरी डेसिमस ज्युनियस ब्रुटस मार्क ऍन्टनीच्या सैनिकांकडून ठार.

सतरावे शतक

  • १६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.
  • १६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.
  • १६९९ : गुरू गोविंद सिंग यांनी 'खालसा'ची स्थापना केली.

अठरावे शतक

  • १७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करून जंजिऱ्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९१२ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
  • १९१५ - तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
  • १९३१ - स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा आल्फोन्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्वात आल्याचे जाहीर केले.
  • १९४० - युनायटेड किंग्डमचे सैनिक नॉर्वेतील नाम्सोस गावात शिरले व गाव काबीज केले.
  • १९४४ - मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
  • १९६२ - जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९८६ - अमेरिकेच्या लढाउ विमानांनी लिब्याच्या बेंगाझी व ट्रिपोली शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
  • १९८६ - बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजून अबाधित आहे.
  • १९८८ : यू.एस.एस.आर.ने अफगाणिस्तानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
  • १९९४ : भारताने गॅट करारास मान्यता दिली.
  • १९९५: टेबल टेनिसमध्ये सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - (एप्रिल महिना)