Jump to content

एप्रिल १३

एप्रिल १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०३ वा किंवा लीप वर्षात १०४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

बारावे शतक

तेरावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

  • १७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
  • १७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.

एकोणिसावे शतक

  • १८२९ - ब्रिटिश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
  • १८४९ - हंगेरी प्रजासत्ताक झाले.
  • १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट सम्टरचा पाडाव केला.
  • १८७० : न्यू यॉर्कमधे मेट्रापोलिटन म्युझियम ऑफ आर्टची स्थापना.

विसावे शतक

  • १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटिश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.
  • १९३९ - भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.
  • १९४१ - जपान व सोवियेत संघाने तटस्थतेचा तह केला.
  • १९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
  • १९४५ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.
  • १९४८ : भुवनेश्वर ही ओदिशा राज्याची राजधानी करण्यात आली.
  • १९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह  प्रक्षेपित केला.
  • १९७० - अपोलो १३मधील ऑक्सिजन टॅंकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
  • १९७४ - व्यापारी तत्त्वावर चालणारा पहिला भूस्थिर उपग्रह वेस्टार १ प्रक्षेपित.
  • १९८४ : भारताने सियाचेन ग्लेसियरवर ताबा मिळवला.
  • १९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.

एकविसावे शतक

  • २००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.
  • २००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.
  • २०१७- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण केले. ऑलिंपिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 75 जणांना पद्मश्री देण्यात आला.

जन्म

मृत्यू

बाह्य दुवे



एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - (एप्रिल महिना)