Jump to content

एनिड ब्लायटन

एनिड ब्लायटन
जन्म नाव एनिड मेरी ब्लायटन
जन्म ११ ऑगस्ट, इ.स. १८९७
ईस्ट डलविच, इंग्लंड
मृत्यू २८ नोव्हेंबर, इ.स. १९६८
हॅम्पस्टीड, इंग्लंड
कार्यक्षेत्रसाहित्य
साहित्य प्रकारकादंबरी, कविता
प्रसिद्ध साहित्यकृती द फेमस फाइव्ह
सिक्रेट सेव्हन
स्वाक्षरीएनिड ब्लायटन ह्यांची स्वाक्षरी
संकेतस्थळhttp://www.enidblytonsociety.co.uk

एनिड मेरी ब्लायटन (११ ऑगस्ट, इ.स. १८९७ - २८ नोव्हेंबर, इ.स. १९६८) ही मुलांसाठी जवळपास सहाशेच्यावर पुस्तके लिहिणारी एक इंग्लिश लेखिका होती.[]

बालपण

चित्रकार, कवी असणाऱ्या वडिलांमुळे एनिडला बालवयातच वाचनाची गोडी लागली. एनिडच्या वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांनी तिला बेकेनहॅममधील सेंट ख्रिस्तोफर्स स्कूल फॉर गर्ल्स या शाळेत घातले. या शाळेत असताना तिने आपल्या दोन मैत्रिणींच्या सहाय्याने एक हस्तलिखित मासिक काढले. शाळेत ती कधीकधी मुलींच्या खोड्या काढत असे व नंतर त्या खोड्यांबद्दलच्या गोष्टीही लिहित असे. चौदाव्या वर्षी काव्यरचनेबद्दल एनिडला एक पुरस्कारही मिळाला. आर्थर मी या बालसाहित्यकाराने तिला उत्तेजन दिले व तिच्या कविताही छापल्या. 'हॅव यू' ही तिची कविता 'नॅश मॅगझिन'मध्ये इ.स. १९१७ साली छापून आली. इ.स. १९१६ साली एनिडची गाठ इडा हंट या शिक्षिकेशी पडली. इडा हंटबरोबर तिने संडे स्कूलमध्ये मुलांचे वर्ग घेतले. मुलांशी संवाद साधण्याची हातोटी आपल्यात आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने इप्सविच हायस्कूलमध्ये किंडर गार्टन टिचर म्हणून प्रशिक्षण घेतले.

वैवाहिक जीवन

इ.स. १९२४ साली ब्लायटनने ह्यूज पोलोक याच्याशी लग्न केले. पोलोक हा न्यूनेस प्रकाशन संस्थेत संपादक म्हणून कामाला होता. इ.स. १९३५ साली चर्चिलचे 'द वर्ल्ड क्रायसिस' हे पुस्तकही पोलोकने काढले होते. इ.स. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याने होमगार्डमध्ये नाव नोंदवले. इ.स. १९४० साली होमगार्डच्या युद्ध कार्यालयाचा प्रशिक्षक म्हणून त्याला घरापासून दूर राहावे लागले. त्यानंतर इ.स. १९४२ साली पोलोकला नागरी संरक्षणाबाबतचा सल्लागार म्हणून अमेरिकेला पाठवण्यात आले. त्यामुळे एनिड आणि पोलोक यांच्यातले संबंध ताणले गेले. परिणामी त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर एनिडने शस्त्रक्रियातज्ञ डॉ. केनेथ वॉटर्स याच्याशी विवाह केला. पोलोकनेही कादंबरीकार इडा क्रोवे हिच्याशी लग्न केले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "एनिड ब्लायटन कलेक्शन" (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.

बाह्य दुवे