एडविन लुट्येन्स
सर एडविन लॅंडसियर लुट्येन्स (२ मार्च, १८९६ - १ जानेवारी, १९४४) एक इंग्रज आर्किटेक्ट होते. यांनी पारंपारिक स्थापत्य शैली आपल्या काळातील आवश्यकतेनुसार बदलून वापर केला. त्यांनी बऱ्याच इंग्रजी घरे, युद्ध स्मारक आणि सार्वजनिक इमारतींची रचना केली.
लूट्यन्स यांनी नवी दिल्लीची रचना आणि बांधकाम करण्यात मोलाची भूमिका बजावली, जी नंतर भारत सरकारचे केन्द्र झाले. त्यांच्या या योगदानाची ख्याती म्हणून नवी दिल्लीला "लूट्यन्स दिल्ली" असेही म्हणतात. सर हर्बर्ट बेकर यांच्या सहकार्याने ते नवी दिल्लीतील इंडिया गेटसारख्या अनेक स्मारकांचे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी व्हायसरॉय हाऊसची रचना केली, जी आता राष्ट्रपती भवन म्हणून ओळखली जाते.
पूर्वीचे जीवन
लूट्यन्स यांचा जन्म लंडनमधील केन्सिंग्टनमध्ये झाला होता. आयर्लंडमधील मेरी थेरेसा गॅल्वे (१८३२/३३ - १९०६) आणि कॅप्टन चार्ल्स हेनरी ऑगस्टस लुटियन्स (१८२९ - १९१५), एक सैनिक आणि चित्रकार यांचे तेरा मुले होती; ज्यातील एडविन हे दहावे होते. लूट्यन्स यांनी १८८५ ते १८८७ या काळात लंडनच्या साउथ केन्सिंग्टन स्कूल ऑफ आर्टमध्ये आर्किटेक्चरचा अभ्यास केला. महाविद्यालयानंतर त्यांनी अर्नेस्ट जॉर्ज आणि हॅरोल्ड पेटो आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमध्ये प्रवेश केला. इथेच त्यांनी सर हर्बर्ट बेकरची प्रथम भेट घेतली. बरेच वर्ष त्यांनी लंडनमधील २९ ब्लूमबरी स्क्वेअर येथील कार्यालयांमधून काम केले.
कारकीर्द
लूट्यन्सच्या सुरुवातीच्या कामामध्ये बरीचशी खासगी घरे होती. त्याने काही चर्चांची रचनादेखील केली. इंग्लंड, भारत, आयर्लंड, आणि स्पेनमध्येही त्याची कामे उपस्थित आहेत.
१९१२ मध्ये कलकत्ताची जागा ब्रिटिश सरकारची राजधानी म्हणून निवडली गेली. १९१२ ते १९३० या काळात २० किंवा त्याहून अधिक वर्षे त्यांनी दिल्लीची रचना केली. हा प्रकल्प १९२९ मध्ये पूर्ण झाला आणि १९३१ मध्ये अधिकृतपणे उद्घाटन झाले. त्यांनी राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, हैदराबाद हाऊसची रचना देखील केली.[१][२][३]
नंतरचे जीवन
४ ऑगस्ट १८९८ रोजी लूट्यन्सने लेडी एमिली बुल्वर-लिटन (१८७४-१९६४) बरोबर लग्न केले. एमिली ही एडिथ आणि लॉर्ड लिटन (भारताच्या माजी गव्हर्नर जनरल) यांची तिसऱ्या कन्या होती. त्यांना पाच मुले होती. परंतु त्यांचे लग्न अगदी सुरुवातीपासूनच असमाधानकारक होते कारण लेडी एमिलीचा थियोसोफी, पूर्व धर्म आणि जिद्दू कृष्णमूर्ती यांच्याकडे भावनिक आणि तात्त्विक दृष्टिकोनातून रस निर्माण केला.
आयुष्याच्या उत्तरार्धात लुटियन्स यांना अनेक वेळा न्यूमोनियाचा त्रास झाला. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. १ जानेवारी १९४४ रोजी त्यांचे निधन झाले.
संदर्भ
- ^ "Delhi heritage tour: From Tughlaq to British era, cycle your way to historical monuments". 8 June 2017. 3 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Sir Edwin Landseer Lutyens, English architect and designer". 20 December 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "India's roads: Whose space is it anyway?". 3 July 2017. 2020-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 July 2017 रोजी पाहिले.