एझेर वाइझमन
एझेर वाइझमन ( १५ जून इ.स. १९२४ - मृत्यु: २४ एप्रिल इ.स. २००५) हा इस्रायलचा सातवा राष्ट्राध्यक्ष होता. तो सन १९९३ मध्ये प्रथम निवडून आला. तो त्यानंतर सन १९९८ मध्ये पुन्हा निवडून आला. तो राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या आधी, तो इस्रायल वायू सेनेत कमांडर या पदावर व संरक्षण मंत्री होता.
पूर्वीचे जीवन
त्याचा जन्म तेल अवीव मध्ये झाला.त्याचे वडील शेतीतज्ज्ञ होते. तो इस्रायलचे प्रथम राष्ट्राध्यक्ष चईम वाइझमन यांचा पुतण्या होता.