Jump to content

एकाधिकार

अर्थशास्त्रात जेव्‍हा एका व्यक्ति अथवा संस्थेचे एखाद्या उत्पादनावर अथवा सेवेवर एवढे नियंत्रण होते कि ती व्यक्ति अथवा संस्था विक्रीसंबंधित अटी व मूल्य आपल्या इच्छेनुसार लागू करू शकते अशी स्थिति म्हणजे एकाधिकार अथवा मक्तेदारी. "मोनॉपली" (ग्रीक : μονοπωλίαν, अर्थ : एकाधिकार) ह्या संज्ञेचा वापर सर्वप्रथम ग्रीक तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने त्याच्या "पॉलिटिक्स" नामक ग्रंथात केला होता. मात्र काळानुरूप त्याचे संदर्भ आणि अर्थ बदलत गेले.