Jump to content

एकलव्य साहित्य संमेलन

वाशीम जिल्ह्यातील रिसोड या आडवळणाच्या गावात चाफेश्वर गांगवे या केवळ साहित्यासाठी जगणाऱ्या युवकाने जून २०००मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी एक साहित्य चळवळ उभी केली. त्या चळवळीचे एक फलित म्हणजे रिसोड या गावी भरणारे एकलव्य नावाचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन.

पहिले एकलव्य साहित्य संमेलन २००० साली झाले. त्याचे अध्यक्ष कवी कैलास भाले होते. सुरेश पाचकवडे, भगवान ठग, शेषराव पिराजी धांडे, रा. मु. पगार हे त्यानंतरच्या काही संमेलनांचे अध्यक्ष होते. आठवे एकलव्य साहित्य संमेलन २०१४साली भरणे अपेक्षित आहे.

एकलव्य संस्थेने सलग पाच वर्षे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा घेतली. या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतून पहिल्या येणाऱ्या तीन कवींच्या कवितांना ‘एकलव्य राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.




पहा : साहित्य संमेलने