Jump to content

एकनाथ गीते

एकनाथ गिते (जन्म:२८ फेब्रुवारी १९९६ पिंपरी (खुर्द), परभणी, महाराष्ट्र) हा एक भारतीय अभिनेता आहे जो देवमाणूस या मालिकेत विजयची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय आहे.[][]

मागील जीवन आणि शिक्षण

एकनाथ यांनी महाराष्ट्रातील औरंगाबादच्या समर्थनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून बी.एस्सी पूर्ण केली. त्यांनी मुंबई विद्यापीठातून (अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स) नाट्य कला (एमटीए) मध्ये एम. ए.ची पदवी घेतले.

अभिनय कारकीर्द

एकनाथने २०१७ मध्ये 'जिंदगी नॉट आऊट' या मराठी मालिकेत काम करून आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. २०१८ मध्ये ते हिंदी मालिका 'मेरे साई' मध्ये हिरालालची भूमिका साकारताना दिसले होता. २०१९ मध्ये त्यांनी 'श्री गुरुदेव दत्त' आणि 'तू अशी जवळी रहा' यासारख्या मालिकांमध्ये काम केले. २०१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा 'तांडव' या मराठी चित्रपटात काम केले, यात त्यांनी बबन्याची भूमिका साकारली. २०२०-२०२१ मध्ये ते मराठी मालिका 'देवमाणूस' मध्ये विजयची भूमिका साकारताना दिसत आहेत.[]

फिल्मोग्राफी

मालिका
मालिका भूमिका वर्ष चॅनल
जिंदगी नॉट आउट संग्राम २०१७ झी युवा
मेरे साई हिरालाल २०१८ सोनी टीव्ही
श्री गुरुदेव दत्त सूर्यदेव २०१९ स्टार प्रवाह
तू अशी जवळी रहा अनिकेत २०१९ झी युवा
देवमाणूसविजय २०२०- २०२१ झी मराठी
हृदयी प्रीत जागतेकिश्या २०२२- चालू झी मराठी
चित्रपट
चित्रपट भूमिका वर्ष श्रेणी
तांडव बबन्या २०१९ प्रदर्शित
गेट टुगेदर २०२३ चित्रीकरण चालू

बाह्य दुवे

एकनाथ गीते आयएमडीबीवर

संदर्भ

  1. ^ "Sachin Dhotre's 'Get Together' is all set to hit screens on May 12, 2023". ISSN 0971-8257.
  2. ^ "'आईच माझी पहिली प्रेक्षक', 'देवमाणूस'मधल्या 'विजय' अर्थात एकनाथ गीतेचा प्रवास!". टीव्ही९ मराठी. 2020-10-29. 2021-05-23 रोजी पाहिले.
  3. ^ ""७८ मिस्ड कॉल्स, १४० इन्स्टा स्टोरी, फेसबुक पोस्ट…" 'देवमाणूस' मालिकेतील कलाकाराने मागितली माफी, कारण…". Loksatta. 2023-03-27 रोजी पाहिले.