Jump to content

एंडोस्कोपी

एंडोस्कोपी म्हणजे शरीराच्या पोकळीमध्ये किंवा मार्गामध्ये दुर्बिणीद्वारे केली जाणारी तपासणी अथवा शस्त्रक्रिया असते.

गुद्द्वार तपासणीसाठीचे एंडोस्कोप
'हेकेर' एंडोस्कोप दाखवताना
एंडोस्कोपी करताना वैद्यक

या करिता फायबर ऑप्टिक धाग्यांपासून बनवलेल्या दुर्बिणीचा वापर केला जातो. या मध्ये खालील भागांचा समावेश असतो.

  • कठोर अथवा लवचिकता असणारी नळी,
  • संबधित अवयव दिसण्याकरीता शीत प्रकाश वाहून नेण्यासाठी,
  • भिंग,
  • निरीक्षण छिद्र,
  • गरजेनुसार हत्यार टाकण्याकरिता छिद्र.

इतिहास

प्रथमतः एंडोस्कोपीचा शोध फिलिप बोझीनी याने १८०६ साली लावला परंतु त्याला विएन्ना मेडिकल सोसायटीने मान्यता नाकारली. तदनंतर अमेरिकी सैन्यातील शल्यचिकीत्सक विल्यम ब्युमॉंट यांनी १८२२ साली एंडोस्कोप तयार केला. सुरुवातीस प्रकाश बाहेरून दिला जाई, नंतर त्यात बदल होऊन नळीतून प्रकाश जाईल अशी व्यवस्था करण्यात आली. १९५० साली हेरॉल्ड होपकीन्स यांनी फायबर ऑप्टिक एंडोस्कोप तयार केला जो वैद्यकक्षेत्रातील क्रांतीकारी घटना मानली जाते.

अवयवांनुसार एंडोस्कोपीची नावे

मुत्रवहनसंस्था

  • मूत्रपिंड- नेफ्रोस्कोपी
  • मूत्राशय- सिस्टोस्कोपी
  • मूत्रनलिका- युरेट्रोस्कोपी

इतर

  • कॅप्सुल एंडोस्कोपी