Jump to content

ऋजुता दिवेकर

ॠजुता दिवेकर या भारतातील आघाडीच्या डायटीशयन आणि फिटनेस ट्रेनर आहेत. बॉलिवूडमधल्या करीना, सैफ, लिसा, सोनाली आणि इतर आघाडीच्या ताऱ्यांप्रमाणेच अनिल अंबानींनाही त्यांनी मुंबई मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण दिले आहे. त्यांना २००५ सालचा 'बेस्ट पर्सनल ट्रेनर' पुरस्कार मिळाला आहे. पोषणशास्त्र, क्रीडाशास्त्र आणि योगाभ्यास यामध्ये त्या तज्ज्ञ आहेत. सन २००९ साली त्यांनी लिहीलेल्या 'डोण्ट लूज युवर माइण्ड, लूज युवर वेट[]' या पुस्तकाने विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित केल्याने ते पुस्तक 'बेस्टसेलर' ठरले आहे.

  1. ^ दिवेकर, ॠजुता (२००९). डोण्ट लूज युवर माइण्ड, लूज युवर वेट (अनु.). पुणे: अमेय प्रकाशन. pp. २०४.