ऊस
ही एक तृणवर्गीय वनस्पती आहे. ऊस मुख्यत्वे, गुळासाठी, साखरेसाठी पिकवण्यात येतो. भारत व ब्राझील या देशांत हा प्रामुख्याने पेरला जातो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे.
उसाच्या उत्पादनासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती :
उत्पादक कटिबंध - उष्ण-आर्द्र कटिबंध
तापमान - २१ से २७ सें. ग्रे.
पाऊस - ७५ से १२० सें. मी.
माती - काळी कसदार
भारतातील प्रमुख ऊस संशोधन केंद्रे :
भारतीय ऊस अनुसंधान संस्था, लखनौ
राष्ट्रीय साखर संस्था, कानपूर
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे
चीनी प्रौद्योगिकी मिशन, नवी दिल्ली
ऊस प्रजनन संस्था कोइंबतूर,तमिळनाडू
पिकवण्याच्या पद्धती व वापर
ऊस हे वार्षिक पीक आहे. उसाच्या पेरापासून (खोडाच्या तुकड्यापासून) नवीन रोप लावतात. उसाला काळी कसदार जमीन लागते, कारण उसाला खूप पोषकद्रव्ये लागतात. लागण व खोडवा या ऊस पिकवण्याच्या २ पद्धती आहेत. उसापासून मोठया प्रमाणात साखर मिळते.
हवामान
ऊसावर हवामानातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि सुर्यप्रकाश या घटकांचा परिणाम होतो. ऊस लवकर उगवणीसाठी वातावरणातील तापमान १० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. वाढीच्या अवस्थेत उसाला २५ डिग्री ते ३५ डिग्री से.च्या दरम्यान तापमान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व चांगला सूर्यप्रकाश उपयुक्त ठरतो.
लागवड
- लागवड पट्टा पद्धतीत २.५ फूट किंवा ३ ६ फूट अंतरावर केल्यास उसाची वाढ जोमदार होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.
- उसाची लागवड करण्याअगोदर रोग व कीडप्रतिबंधक उपाय म्हणून १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम आणि ३०० मि.लि. मॅलेथिऑन प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करतात. त्यामध्ये टिपरी १० ते १५ मिनिटे बुडवून नंतरच लागण करतात.
- उसाची लागण करतेवेळी आडसाली उसाला हेक्टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश देतात. पूर्वहंगामामध्ये हेक्टरी ३४० किलो नत्र, १७० किलो स्फुरद आणि १७० किलो पालाश देतात. खतमात्रा मातीपरीक्षणानुसारच देणे योग्य असते. या शिफारशीत खतमात्रेमधून लागवडीच्यावेळी दहा टक्के नत्र, ५० टक्के स्फुरद आणि ५० टक्के पालाश या प्रमाणात देतात. उरलेली खते (स्फुरद व पालाश) मोठ्या बांधणीवेळी देतात. नत्राची ४० टक्के मात्रा ४५व्या दिवशी, दहा टक्के मात्रा ९०व्या दिवशी आणि ४० टक्के मात्रा मोठ्या बांधणीवेळी देतात, तसेच सल्फर या खताची मात्रा लागणीवेळी ६० किलो प्रति हेक्टरी शेणखतात मिसळून देतात.
उपयोग
साखर कारखान्यांमध्ये उसापासून साखर बनविली जाते. मळी, इथेनॉल व बग्यास- चिपाड (रस काढून उरलेला चोथा) हे उसापासून मिळणारे उप-पदार्थ आहेत. मळीपासून पिण्याची दारू बनवता येते. उसाच्या चिपाडापासून पेपर बनविला जातो. बग्यास वापरून वीजनिर्मिती केली जाते. उसापासून साखर तयार होते.
उसाचे वानस्पतिक वर्गीकरण :
सॅकरम वंशाच्या पाच मुख्य जाती खालीलप्रमाणे आहेत :
सॅक्रम सायनेन्स :-
याला चिनी उसाच्या नावाने ओळखले जाते. याचे उद्भवस्थान मध्य आणि आग्नेय चीन हे आहे.
लांब पोरियुक्त पातळ वृंत आणि लांब व संकुचित पानांनी युक्त असा हा ऊस आहे.
यात सुक्रोस अंश व शुद्धता कमी असते तसेच रेशा आणि स्टार्च अधिक प्रमाणात असतात.
गुणसूत्र संख्या २x = १११ ते १२० असते.
या जातीमध्ये ऊबा नावाची एक उल्लेखनीय प्रजाती आहे; तिची शेती अनेक देशांत केली जाते.
या जातीला व्यावसायिक शेतीसाठी अनुपयुक्त मानले जाते.
सॅक्रम बार्बेरी :-
ही जात उपोष्ण कटिबंधीय भारताचा मूळ ऊस आहे.
याला 'भारतीय जात' मानले जाते.
उपोष्ण कटिबंधीय भारतामध्ये गूळ आणि खडीसाखर निर्माण करण्यासाठी याची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते.
या उसापासून बनलेल्या गुळाचे गुण
उसाच्या रसापासून विभिन्न पदार्थ तयार केले जातात. गूळ, काकवी, साखर, खडीसाखर, साखर इत्यादी. या पदार्थांच्या गुणांमध्ये पण थोडाफार फरक असतो.
सॅकेरम रोबस्टम ही जास्त मजबूत व रोग प्रतिरोधी जात आहे यातील उसामध्ये जास्त शर्करा व रेशाेचा अंश असते. हे पातळ वृंताचे असते. या जातीचे क्लोन उच्च व निम्न तापमान, समस्याग्रस्त मृदा आणि जलाक्रांत दशांसाठी जास्त सहिष्णु आहे. सैकेरम रोबस्टम
ही जाति न्यू गिनी द्वीप समूह मध्ये शोधून काढली होती. या जातिच्या उसाचे वृंत लांब, जाड एवं बढ़ने मध्ये ओजपूर्ण असतात.
यह रेशा से भरपूर है और अपर्याप्त शर्करा अंश रखती है। गुणसूत्र संख्या 2x = 60 एवं 80 है। यह जंगली जाति आहे आणि कृषि उत्पादनासाठी अनुपयुक्त आहे.
सॅकेरम स्पाॅन्टेनियम :-
याला 'जंगली गन्ने'च्या रूपात ओळखले जाते. याची प्रजाती गुणसूत्रांच्या परिवर्तनशील संख्या (2x = 40 ते 128) आहे. या जातीची आकारात विविधता असते.
रोग
- पांढरा लोकरी मावा
- उसाचा गवताळवाढ रोग
- खोडकिडा
- तांबेरा
कारखानदारी
- सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने
- खाजगी मालकीचे साखर कारखाने
- गुऱ्हाळे
ऊसउत्पादन
उत्पादन २००८ (आकडे टनांमध्ये)
देश | उत्पन्न |
---|---|
ब्राझील | ६४,८९,२१,२८० |
भारत | ३४,८१,८७,९०० |
चीन | १२,४९,१७,५०२ |
थायलंड | ७,३५,०१,६१० |
पाकिस्तान | ६,३९,२०,००० |
मेक्सिको | ५,११,०६,९०० |
कोलंबिया | ३,८५,००,००० |
ऑस्ट्रेलिया | ३,३९,७३,००० |
आर्जेन्टिना | २,९९,५०,००० |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने | २,७६,०३,००० |
हे सुद्धा पहा
संदर्भ
http://drbawasakartechnology.com/m-SugarCaneLagawad.html#.Wt2BpxuFPIU