Jump to content

उ थांट

उ थांट

कार्यकाळ
३० नोव्हेंबर १९६१ – ३१ डिसेंबर १९७१
मागील दाग हामारहोएल्ड
पुढील कर्ट वाल्डहाइम

जन्म २२ जानेवारी १९०९ (1909-01-22)
पंतनाव, बर्मा, ब्रिटिश भारत
मृत्यू २५ नोव्हेंबर, १९७४ (वय ६५)
न्यू यॉर्क शहर, अमेरिका
राष्ट्रीयत्व बर्मी
धर्म थेरवादी बौद्ध
सही उ थांटयांची सही

उ थांट (बर्मी: ဦးသန့်; ; २२ जानेवारी १९०९ - २५ नोव्हेंबर १९७४) हा एक बर्मी राजकारणी व संयुक्त राष्ट्रांचा तिसरा सरचिटणीस होता. तो सरचिटणीस पदावर १९६१ ते १९७१ दरम्यान होता.

बर्माचा पहिला पंतप्रधान उ नुचा जवळचा मित्र असलेला थांट नुच्या मंत्रीमंडळामध्ये विविध खात्यांवर राहिला होता. १९६१ साली दाग हामारहोएल्डच्या अपघाती मृत्यूनंतर थांटची सरचिटणीसपदावर नियुक्ती झाली. थांटने १९६२ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीसोव्हिएत अध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह ह्यांच्या दरम्यान सलोखा घडवून आणण्याचे व क्युबामधील युद्धसदृष परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न केले. व्हियेतनाम युद्धामधील अमेरिकेच्या भूमिकेवर थांटने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

पुरस्कार

बाह्य दुवे